पनवेल महापालिका निवडणुकीत घरोघरी लिफाफ्यातून लक्ष्मीदर्शनाची चर्चा; प्रत्येक मतदाराला दोन हजारांचा ‘दर’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारी सायंकाळी विरला आणि मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना पनवेलमध्ये लक्ष्मीदर्शनाला वेग आला. एरव्ही रात्रीच्या वेळी छुप्या मार्गानी घडवले जाणारे हे लक्ष्मीदर्शन या निवडणुकीत मात्र दिवसाढवळ्या सुरू असल्याची चर्चा आहे. पाकिटांत नोटा भरून ताई तुमचं पाकीट आलंय, असे सांगत मतदाराच्या घरी त्याची किंमत पोहोचवण्याची जबाबदारी उमेदवारांच्या खास गोटातील व्यक्तींवर सोपवण्यात आली होती. एका मतदाराला चार मते द्यावी लागणार असल्यामुळे प्रत्येक मतदाराची किंमत ५०० रुपयांवरून वधारून २००० रुपयांवर पोहोचल्याची चर्चा आहे.
निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शी वातावरणात पार पडावी, म्हणून राज्य निवडणूक आयोगाने पनवेल पालिकेच्या आयुक्तांची बदली केली, मात्र तरीही मते विकण्याचे आणि विकत घेण्याचे प्रकार पनवेलमध्ये सर्रास सुरू आहेत. प्रत्येक मतदारासाठी चार उमेदवार मिळून २००० रुपये मोजत असल्याची चर्चा आहे. पाकिटे वाटण्याचे काम शहरात भरदिवसा सुरू होते, मात्र निवडणूक आयोगाला त्याचा सुगावा लागला नाही. पनवेल पालिकेमध्ये सव्वाचार लाख मतदार आहेत.
सुट्टय़ांमुळे मतदानाचा टक्का कमी होईल अशी भीती असल्यामुळे प्रत्येक मतदार हा उमेदवाराच्या गळ्यातील ताईत झाला आहे. पनवेलबाहेर स्थायिक असलेल्या किंवा सुटीनिमित्त गावी गेलेल्या मतदारांना मतदानापुरते हजर करण्याची आणि त्यांची उत्तम बडदास्त ठेवण्याची सोय आधीच झाली आहे. काही मतदारांनी लक्ष्मीदर्शनाकडे पाठ फिरवली असून ‘नको तुमची पाकिटं, आम्ही करू मतदान’ असेही ठणकावले आहे. परंतु काही ठिकाणी पाटर्य़ाचे आयोजन सुरू आहे.
पाकीट नाकारणाऱ्यांपैकी अनेकांनी मद्याच्या महागडय़ा बाटल्या मात्र स्वीकारल्याची चर्चा आहे. घरोघरी प्रचार करणे, पत्रके वाटणे, प्रचारसभेत उमेदवारांसोबत फिरणे, डिजिटल फलक असलेली गाडी चालवणे, फलक बनवणे, पत्रके बनवणे, ती छापणे, वृत्तपत्रांना जाहिराती, जेवणाच्या ऑर्डर, मंडप व साऊंड, रस्त्यावर झेंडे लावणे, घोषणाबाजी, उमेदवारांची फोटोग्राफी, त्यांचा मेकअप अशी विविध कामे मिळाल्यामुळे पनवेलमधील अनेकांचे खिसे या महिनाभरात चांगलेच गरम झाले आहेत.
निवडणूक यंत्रणेने साडेतीन हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी लावले असले, तरी लक्ष्मीदर्शनावर कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.
मातब्बरांच्या प्रभागांत मतदारांची चंगळ
प्रभाग १९ मधून रामशेठ ठाकूर यांचे पुत्र निवडणूक लढवत आहेत. याच प्रभागात शेकाप आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्याशी ठाकूर यांची लढत आहे. त्यामुळे या प्रभागात मोठय़ा प्रमाणात लक्ष्मीदर्शन होईल, अशी चर्चा आहे. असेच चित्र प्रभाग १८ मध्येही आहे. शेकापचे जे. एम. म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांच्याशी भाजपचे नितीन पाटील यांचा सामना होत असल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात लक्ष्मी पदरात पडेल अशी अपेक्षा मतदारांना होती. हा दर इतर प्रभागांच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे या चुरशीच्या लढतीमध्ये अद्याप तरी चढय़ा बोली ऐकायला मिळाल्या नाहीत. निवडणुकीला एक दिवस शिल्लक असल्यानंतर काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात लक्ष्मी प्रकट होण्याची चिन्हे आहेत.