आज (गुरुवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास सी उड मॉल समोर अपघात झाला. यात एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने पार्किंग मधील चार दुचाकी आणि तीन रिक्षांना जोरदार धडक दिली. यात एक रिक्षाचालक जखमी झाला आहे.
यातील कार चालक प्रवीण पुजारी हा कार घेऊन सी उड मॉल परिसरात आला असता वळण घेत असताना कार चालकाने ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबले आणि अचानक कारने वेग पकडला काही कळण्याच्या आत चार दुचाकी आणि तीन रिक्षांना जबर ठोकर बसली.
हेही वाचा >>> नवी मुंबई : रबाळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयात टॅबलॅब व ॲक्टिव्हिटी झोनव्दारे कल्पक शिक्षणावर भर
या अपघातात एक रिक्षा चालक जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे आहे.
ही माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक हनुमंत गलांडे पथकासह पोहचले. अपघाताने जमलेल्या बघ्यांच्या गर्दीने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गलांडे व पथकाने अपघात ग्रस्त गाड्या अगोदर बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. तसेच जखमी रिक्षा चालकाला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चार दुचाकी व तीन रिक्षांचे मोठे नुकसान झालेच शिवाय अपघाताला कारण ठरलेल्या कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती नेरुळ पोलिसांनी मिळताच तेही या दरम्यान दाखल झाले त्यांनी गाडी चालक प्रवीण पुजारी याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी कार चालक प्रवीण याने चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबले असे कारण सांगितले असले तरी गाडीची तपासणी झाल्यावर आलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.