लोकसत्ता टीम

पनवेल: पनवेल शहरातील ओरीयन मॉलसमोरील निलखंड दर्शन या इमारतीमध्ये ओर्चिड वेलनेस स्पा चालकाला वारंवार मानसिक त्रास देऊन त्याच्याकडून १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन त्या स्पा चालकाकडून फोन पे आणि जी पेवरुन २६ हजार रुपये स्विकारणाऱ्या चार पत्रकारांच्या चौकडीविरोधात पोलीसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप हे पत्रकार पोलीसांच्या तावडीत सापडले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

सानपाडा येथे राहणारे ३२ वर्षीय स्पा चालक व्यक्तीने पोलीसांत याबाबत रितसर तक्रार दिली आहे. संबंधित पत्रकारांच्या चौकडीने अनेक दिवसांपासून पोलीसांची डोकेदुखी वाढविली होती. पनवेल शहरासोबत इतर पोलीस ठाण्यातही या पत्रकारांनी धुमाकुळ घातला होता. यापूर्वी कळंबोली पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरिक्षकाला लेडीज सर्व्हीस बारवर कारवाई न केल्याने एका पत्रकाराने शिवीगाळ केली होती. याबाबतची ध्वनीफीत समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर त्या पत्रकाराविरोधात गुन्हा नोंदविला होता. अद्याप तो सुद्धा पत्रकार पोलीसांना सापडला नाही. हफ्ते मागणाऱ्या पत्रकारांविरोधात कठोर कारवाई न झाल्याने भुरट्या पत्रकारांचा पनवेलमध्ये सूळसूळाट झाल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा-पनवेल: परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने शेकडो तरुणांची लाखोंची फसवणूक

पनवेल शहर पोलीसांनी दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये स्पा चालकाला ऑगस्ट महिन्यापासून पत्रकारांची चौकडी त्रास देत होती. निलखंड या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत ओर्चिड स्पा सूरु असून यामध्ये गैरकृत्य होत असल्याची खोटी तक्रार पत्रकारांची ही चौकडी नवी मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षाला करत होती. तक्रारीनंतर वेळोवेळी पोलीस येऊन संबंधित स्पा ची तपासणी केल्यावर काही आढळत नसल्याने संबंधित स्पा चालकाला व्यवसाय ठप्प झाला होता. अखेर वैतागलेल्या स्पा चालकाने पत्रकारांच्या चौकडीसमोर हात टेकले. त्यांच्यासोबत बोलणी केल्यावर स्पा चालकाच्या पायाखालची वाळू सरकली. पत्रकारांच्या या चौकडीने एका वेळेच्या सेटेलमेन्टसाठी १० लाख रुपयांची मागणी केल्यामुळे संबंधित स्पा चालकाने पोलीसांकडे धाव घेतली. सध्या पत्रकारांची ही चौकडी पोलीसांना सापडली नसल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.