लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल : वीज महावितरण कंपनीच्या पनवेल विभागातील नावडे शाखा कार्यालयातील वरीष्ठ तंत्रज्ञ कर्मचाऱ्याला मारहणी प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणि मारहाण असे विविध गुन्हे पाटील पिता-पुत्रांवर दाखल केले आहेत.

महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ संदेश खुटले व त्यांचे सहकारी जितेंद्र पाटील हे ३० डिसेंबरला नेहमी प्रमाणे थकबाकीची वसुलीसाठी वावंजे गाव येथे गेले होते. वीज ग्राह क दत्तात्रय गोविंद पाटील यांची दोन महिन्याची वीज देयकाची थकबाकी असल्यामुळे त्यांना थकीत बिल भरा अन्यथा वीज खंडित करावी लागेल असे सांगितल्यावर दत्तात्रय पाटील व त्याचा मुलगा विशाल दत्तात्रय पाटील याने ‘वीज कशी कट करतो, तुला बघतोच अशी धमकी देऊन शिवीगाळ व दमदाटी करू लागले. वीज जोडणी तोडायला त्याच्या घरासमोर असलेल्या विजेच्या खांबाकडे जात असताना दत्तात्रय पाटील याने तंत्रज्ञ संदेश खुटले यांच्या गालावर जोराने चापट मारल्याचे पोलीसांना दिलेल्या तक्रारीत संदेश यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा-नवी मुंबईतील ‘या’ गावांचा पाणीपुरवठा २ दिवस बंद राहणार, काय आहे कारण?

वीज चोरी मोहीम किंवा थकीत वीज देयकांची वसुलीची मोहीम राबवत असताना, महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना घेराव घालण्याची ग्रामस्थांची ही नियमित सरावाची पद्धत होती. मात्र या प्रकरणांमध्ये संदेश खुटले यांनी कुठलीही माघार न घेता फौजदारी कार्यवाही करण्यावर ठाम राहीले. स्वता मारहाण करुन वीज महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांविरोधात वीजग्राहकांनी पोलीसांत विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतू घटनास्थळी घडलेला संपूर्ण प्रकार ध्वनी चित्रफिती मार्फत रेकॉर्ड केल्यामुळे खोटी तक्रार पोलीसांनी घेतली नसल्याकडे महावितरण कंपनीने लक्ष वेधले आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात वीज ग्राहक दत्तात्रय गोविंद पाटील व त्याचा मुलगा विशाल दत्तात्रय पाटील या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासाठी भारतीय दंड संहिता १८६० प्रमाणे कलम ३५३, कलम ३३२, कलम ५०४, कलम ५०६ व कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करून पनवेल तालुका पोलिस ठाणे पुढील कारवाई करत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case has been registered against the accused for assaulting an employee of mahavitaran mrj
Show comments