नवी मुंबई : आयात निर्यातचा व्यवसाय वाढवण्यासाठी १० कोटींचे कर्ज थेट लंडनमधील बँकेतून काढण्यासाठी ३६ लाख ६६ हजार ५ रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कर्जातील काही रक्कम स्वतःसाठी ठेऊन उर्वरित रक्कम मित्राच्या व्यवसायासाठी, असे एकत्रित कर्ज काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

फरनाझ पिपुलकर, धनराज शेट्टी, पराग मोंडकर, आणि विनय नायर, अशी आरोपींची नावे आहेत. तर फिर्यादी रुपाली जगन्नाथ बनसोडे (रा. कन्नमवार नगर) यांचा आयात निर्यातचा व्यवसाय आहे. त्यांना काही कर्ज हवे होते, यासाठी त्या प्रयत्न करीत होत्या. दरम्यान त्यांना त्यांच्या भावाच्या मित्राची पत्नी फरनाझ हिने आपण स्वतः आयसीआयसीआय बँकेत कर्ज विभागात काम करते, असे सांगितले. त्यावरून फिर्यादीने कर्ज घेण्याचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान त्यांनी खाजगी कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र व्याज जास्त असल्याने कर्जास नकार दिला. शोधाशोधदरम्यान फिर्यादी यांचे भाऊजी मिथून महाले यांचे परिचित मनोज गुप्ता यांनाही दहा कोटी रुपयांची गरज होती. म्हणून फिर्यादी आणि गुप्ता मिळून कर्ज काढावे, असे महाले यांनी सूचवले. त्यानुसार पन्नास लाख बनसोडे ठेवून घेतील, तर साडेनऊ कोटी गुप्ता ठेऊन घेतील, असे ठरले. यासाठी मनोज यांची कोटा येथील जमीन गहाण ठेवण्याचे ठरले.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
300 crore extortion from female officer on fear of involvement in embezzlement Mumbai print news
३०० कोटींच्या गैरव्यवहारातील सहभागाची भीती दाखवून महिला अधिकाऱ्याकडून खंडणी उकळली; चौघांविरोधात गुन्हा
Property worth 61 crore seized during elections period from backward Vidarbha
मागास विदर्भ निवडणूक काळात संपन्न, ६१ कोटींची मालमत्ता जप्त
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
excise department registered 226 cases of illegal liquor traffic in suburbs
अवैध मद्य वाहतुकीबद्दल उपनगरात २२६ गुन्हे दाखल

हेही वाचा – माणूस घडवणारे सर्वात मोठे विद्यापीठ रेवदंडयात; सचिन धर्माधिकारींना डी लिट पदवी बहाल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं विधान

हेही वाचा – आप्पासाहेबांच्या विचारांतून सत्कार्याची प्रेरणा, एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

२ जानेवारी २०१७ मध्ये कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. फरनाझ यांनी कर्जासाठी मदत करणाऱ्या अन्य तीन आरोपींची ओळख करून दिली. दहा कोटींचे कर्ज लंडन येथील आयसीआयसीआय बँक देणार असून, मनी टू इंडियानुसार पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, असे फरनाझ हिच्याकडून सांगण्यात आले. इथपर्यत सर्व सुरळीत होते. यासाठी विविध ठिकाणी बैठकाही झाल्या. हे कर्ज वार्षिक सहा टक्के परतफेड असणार होते. बँक चार्जेससाठी म्हणून टप्प्याटप्प्याने ३६ लाख ६६ हजार ५ रुपये आरोपींना देण्यात आले. मात्र, कर्ज देण्यात आले नाही. शेवटी आपली फसवणूक केली जात आहे हे लक्षात आल्यावर याबाबत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.