संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई: नवी मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकावर व शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या हालचालींवर जवळजवळ १६०५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. परंतू नवी मुंबई महापालिकेत बहुचर्चित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम दिरंगाईने होत आहे. पालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावरील नियंत्रण कक्षाचे काम करण्यात आले आहे परंतु, शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम फक्त ७० टक्केपर्यंत झाले आहे. सुरवातीला कामाचे कार्यादेश दिले तेव्हा हे काम २२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु पालिकेने या कामासाठी मुदत वाढवून ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत दिली होती. अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने आता ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सुरवातीला शहरात पोलिसांबरोबर सर्वेक्षण पूर्ण करुन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. बेलापूर विभागातून कॅमेरे लावण्यास सुरवात झाली होती. संपूर्ण शहर १६०५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत येणार असून कॅमेऱ्यांची संख्या हनुमानाच्या शेपटीसारखी वाढतच असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा-उरण-खारकोपर स्थानकांच्या नावासाठी रेल्वे मंत्र्यांना साकडे

नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सीसीटीव्हीच्या कामातही मे. टाटा अॅडव्हान्स सिस्टम लि.कडून दिरंगाई होत असल्याने शहरावर व सार्वजनिक ठिकाणच्या बारीक हालचालीवर तिसऱ्या डोळ्याची नजर कधी लागणार व नवी मुंबईकरांच्या सुरक्षितेमध्ये अधिक वाढ कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुळातच बहुचर्चित असलेल्या या कामावरुन निविदेवरुन व दरावरुन मागील अनेक वर्षापासून हा प्रस्ताव गटांगळ्या खात होता. परंतू तत्नकालिन पालिका आयुक्त बांगर यांच्या काळात या कामाला कार्यादेश मिळाला. त्यामुळे आता आयुक्त नार्वेकर यांच्या कार्यकाळात तरी हे काम प्रत्यक्षात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई शहरात प्रवेश करण्यात येणाऱ्या ऐरोली मुलुंड उड्डाणपुल, ठाणे दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका, बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्वच प्रवेशद्वारावर तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. शहराच्या प्रत्येक प्रवेश निर्गमन जागेवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-नवी मुंबई : हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात, घाऊक बाजारात प्रतिडझन २००-५०० रुपयांवर

वाहनाबाबतची माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित पध्दतीने नंबर प्लेट् वाचण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येत आहेत. तसेच शहरातील २७ मुख्य चौकांसाठी १०८ कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सर्व बसडेपो, मार्केट, उद्याने, मैदाने, पालिका कार्यालये, वर्दळीची ठिकाणे, चौक, नाके, मर्मस्थळे ही सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत येणार आहेत.तसेच शहरातील वर्दळीचे पामबीच मार्ग ,ठाणे बेलापूर रोड, पालिका हद्दीतील सायन पनवेल रोड येथे हायस्पिड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉलबॉक्सची सोय असणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मागणीनुसार देशविघातक व घातपात कृत्यावर लक्ष ठेवण्यासाठी खाडी व समुद्र किनारे अशा ९ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ८ ठिकाणी स्थानिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.

नवी मुंबई महापालिका मुख्यालय केंद्रीय नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे. तसेच या कामाचा डेटा सेंटर पोलीस मुख्यालय असेल तसेच ते पालिकेकडेही पहिल्या मजल्यावर तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात असणार आहे. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालय किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये विभागीय चित्रीकरण असणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागात घटना घडली तर ती नजीकच्या पोलीस स्थानकातही पाहता येणार आहे. रेड लाईट व्हायलेन्सन म्हणजेच सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांच्यावर नजर ठेवण्यासाठी देखरेखीसाठी ९६ कॅमेरे असणार आहेत. त्यामुळे नागरीकांनाही वाहतूक नियमांच्या शिस्तीचे पालन करावे लागणार आहेत. परंतू शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येण्यास विलंब लागणार असल्याचे चित्र आहे. याबाबत संबंधित मेसर्स टाट अॅडव्हान्स सिस्टम कंपनीचे प्रकल्प प्रमुख राहुल कोठावडे यांना विचारणा केली असता कामात काही तांत्रिक अडचणी येत असून कॅमेरे लावण्याचे काम वेगात करण्यात येत आहे असे लोकसत्ताला सांगितले.

कोणते व किती कॅमेरे

हाय डेफिनेशन कॅमेरे-९५४
पीटीझेड कॅमेरे-१६५
वाहनांची गती देखरेख कॅमेरे-९६
पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा-४३ ठिकाणे
खाडी व समुद्र किनारे देखरेख थर्मल कॅमेरे-९
सार्वजनिक घोषणा ठिकाणे-१२६

नवी मुंबई शहरात जवळजवळ १६०५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ३१ मार्चपर्यंत या कामाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. ती सुध्दा मुदत संपण्यात आली. त्यामुळे पालिका ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत पालिका विचाराधीन आहे. -शिरीष आरदवाड, सह शहर अभियंता

Story img Loader