उरण : अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने उरणच्या राम मंदीर चौकातून सोमवारी उरण मधील नागरिकांनी पुष्प वर्षाव,भव्य रांगोळ्या,डीजे,ढोल,ताशे, लेझीम,ब्रास बँड आणि भजनांचा निनादात शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात गणपती चौक ते स्वामी विवेकानंद चौक,कामठा मार्ग,पालवी रुग्णालय,बालई मार्गे जारीमरी मंदीर,बाजारपेठ मार्गे पुन्हा गणपती चौका पर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली.
हेही वाचा…उरण स्थानक परिसरातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा इशारा
या मिरवणुकीत,महिला, लहान मूल,जेष्ठ नागरिक यांच्यासह तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या राम घोषात निघालेल्या शोभायात्रेचे उरणच्या नागरिकांनी ठिकठिकाणी रांगोळी, पुष्प वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. तर महिला आणि तरुणांनी राम धुनिवर नृत्य करीत आपला आनंद व्यक्त केला. या शोभायात्रेत उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी हे सहभागी झाले होते. या शोभायात्रेमुळे उरण शहरात प्रवेश करण्यासाठी असलेले काही मार्ग बंद करण्यात आले होते. त्याचप्रमाणे संपूर्ण बाजारपेठ ही बंद होती. या शोभायात्रेमुळे शहरात उत्साह दिसत होता. सर्वत्र राम नामाचा जयघोष दुमदुमत होता.