सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या जागी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांची राज्य सरकारने बुधवारी नियुक्ती केली. नवी मुंबई विमानतळाबरोबरच दक्षिण स्मार्ट सिटी, नैना, मेट्रो, नेरुळ-उरण रेल्वे, सर्वसामान्यांसाठी परवडणारी ५५ हजार घरे बांधण्याचे तसेच इतर बडे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून भूषण गगराणी यांच्यावर असेल.
कामगिरी आणि वैशिष्टय़
* राज्याच्या उद्योग विभागाच्या वतीने मुंबईत झालेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाचे नेटके आयोजन.
* मराठी भाषेतून परीक्षा देणारे पहिले सनदी अधिकारी.
अन्य जबाबदाऱ्या
सिडकोने देशातील पहिल्या स्मार्ट सिटीची घोषणा केली असून त्यासाठी ३४ हजार कोटींची तरतूद केली आहे. खारघर, कळंबोली द्रोणागिरी परिसरातील सात उपनगरांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
त्यामुळे विमानतळापेक्षा सिडको स्मार्ट सिटीची उभारणी कशी करते हे पाहण्यात नागरिकांना जास्त रस आहे. वाहतुकीच्या विविध साधणांचा विकास करताना सिडकोने भारतीय रेल्वेच्या सहकार्याने ६७ टक्के खर्चातील हिस्सा उचलून नेरुळ-उरण रेल्वेचे काम सुरू केले आहे.
आव्हाने
* १५ हजार कोटी रुपयांच्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या पायाभरणीचे काम.
* सहकंत्राटदार म्हणून इतर छोटी-मोठी कामे घेताना स्थानिक संघर्ष.
* विस्थापित दहा गावांचे
इतरत्र पुनर्वसन, पॅकेजबाबतची प्रकल्पग्रस्तांमधील नाराजी
* रस्ते विकास महामंडळाला नैना प्रकल्पातील २५ टक्के जमीन देण्याबाबतचा निर्णय.
* नगरविकास विभागाच्या लाल फितीत अडकलेल्या पहिल्याच पथदर्शी प्रकल्पाला मंजुरी मिळविणे.
* चार हजार कोटींचा दीड वर्षे रखडलेला मेट्रो प्रकल्प पूर्ण करणे.
* संपूर्ण प्रकल्प उभारणीसाठी जीव्हीके, जीएमआर व टाटा यांच्यापैकी एकास हे
काम.
* सामान्यांसाठी परवडणारी घरे बांधून देणे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा