नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाचा निर्णय रेंगाळल्याने धोरणात्मक निर्णयाबरोबर मान्सून पूर्व नालेसफाईही रखडली आहेत. पावसाळ्याआधी ही कामे करण्यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक कामाच्या मंजूरीसाठी पणन संचालकांना प्रस्ताव पाठवला आहे. आता एपीएमसी मान्सून पूर्व कामाची मंजुरी पणन संचालकांच्या कोर्टात असून परवानगी मिळाली तरच नालेसफाई होईल,अन्यथा पावसाळ्यात एपीएमसीत पाणी तुंबण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेकडून शहरात नाले सफाई, वृक्ष छाटणी , विद्युत कामे केली जातात. साधारणतः मे महिन्यामध्ये ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन केले जाते. त्याचप्रमाणे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मान्सून पूर्व कामे केली जातात. परंतु आता मे महिना उजाडला तरी एपीएमसीत अद्याप नाले सफाईला सुरुवात झालेली नाही. डिसेंबर महिन्यापासून एपीएमसी बाजार समितीतील संचालक मंडळांवर टांगती तलवार आहे. संचालक मंडळाचे कोरम पूर्ण होत नसल्याने बैठक ठप्प आहेत. त्यामुळे एपीएमसीतील धोरणात्मक निर्णयासह इतर कामे रखडली आहेत. यामध्ये मान्सूनपूर्वकामे देखील कचाट्यात सापडली आहेत. या मान्सूनपूर्व कामाकरता निधीची आवश्यकता असते, संचालक मंडळ नसल्याने या कामासाठी लागणाऱ्या निधीची मंजुरी कोण देईल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एपीएमसीतील इतर कामे ठप्प असले तरी पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक असलेली नालेसफाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने पणन संचालकांकडे या मान्सून पूर्व कामांतर्गत अत्यावश्यक कामांना मंजुरी देण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे . या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच एपीएमसीमधील नालेसफाईला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.

हेही वाचा.. नवी मुंबई : कामोठे येथे बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई; आरोपींमध्ये चार महिलांचाही समावेश

एपीएमसीतील मान्सूनपूर्व कामांतर्गत आवश्यक नालेसफाईकरता पणन संचालकांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. पणन संचालकांकडून मंजुरी मिळतात नालेसफाईला सुरुवात करण्यात येईल. – किरण घोलप, स्वच्छता अधिकारी, एपीएमसी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chances of waterlogging in apmc during monsoon asj