उरण : जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ११ ते १४ डिसेंबर दरम्यान जेएनपीटी मधून सुटणारी लाँच ही गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्का पर्यंत जाणार आहे अशी माहिती जेएनपीटी वाहतूक विभागाने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नौदलाच्या गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमामुळे जल वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे.पावसाळ्यातील चार महीने भाऊचा धक्का( फेरी वार्फ जेट्टी) पर्यंत जाते. मात्र त्यानंतर ही सेवा गेट वे पर्यंत सुरू करण्यात येते. या संदर्भात जेएनपीटीच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक प्रसिद्धी केले आहे.

हेही वाचा… सागरी जलाधिक्षेत्रात एलईडी आणि परदेशी, परप्रांतीय बेसुमार मासेमारीमुळे संकट

हेही वाचा… उरणध्ये एका दिवसात कंटनेर धडकेत दोन बळी

उरण मधील मोरा व जेएनपीटी या दोन्ही बंदरातून जलसेवा सुरू आहे. या दोन्ही सेवा बारमाही म्हणजे पावसाळ्यातही सुरू असतात. जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ही सेवा आठ महीने सुरू असते.ती पावसाळ्यात बदलून जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्का या मार्गावर सुरू केली जाते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात जेएनपीटी लाँच सेवा ही रात्री दहा ऐवजी ९ वाजता बंद केली जाते. ती पुन्हा रात्री दहा वाजता पर्यंत सुरू राहील. या जल मार्गाने उरण मधील बंदर व इतर उद्योगातील अधिकारी कर्मचारी आणि नागरीक ही प्रवास करीत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in jnpt to gateway of india passenger boat service between 11 to 14 december asj