नवी मुंबई : रविवारी २६ नोव्हेंबरला पाम बीच वर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असून त्यामुळे नियमित वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मॅरेथॉन व्यवस्थित पार पडावी तसेच नियमित वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक मार्गात बदल वाहतूक पोलीस विभागाने केले आहेत. स्वच्छता सर्वेक्षण मध्ये आपला आणि सर्वसामान्यांचा सहभाग आवश्यक असून त्यासाठी जनजागृती करण्यासाठी लेट्स सेलिब्रेट फिटनेस यांनी मनपाच्या सहकार्याने भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. मॅरेथॉन रविवारी २६ नोव्हेंबरला सकाळी होणार असून यासाठी वाहतूक विभागाने मार्ग बदल केले आहेत.
वाशीकडुन बेलापुर जाणा-या मार्गिका मार्गाने वळविण्यात येणार आहे. ( पामविच मार्गावर मोराज सर्कल पासून बेलापुरकडे जाणाऱ्या वाहीनीवर दोन्ही बाजुकडील वाहतुक वळविण्यात येणार आहे.) २६ नोव्हेंबरला पहाटे ०२.०० वाजता ते सकाळी १०.०० वाजताचे दरम्यान पामविच मार्गावरील बेलापुर कडुन वाशी/ मुंबई/ ठाणे कडे जाणा-या वाहीनीवर मोराज सर्कल पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करून सदर वाहनांची वाहतूक ही पामविच मार्गावरील वाशीकडून बेलापुर जाणा-या वाहीनी मार्गाने वळविण्यात येत आहे. (पामविच मार्गावर मोराज सर्कल पासून बेलापुरकडे जाणा-या वाहीनीवर दोन्ही बाजुकडील वाहतुक वळविण्यात येत आहे.
हेही वाचा : उरण : चिरनेर शेतकऱ्यांनी बांधले दोन वनराई बंधारे, पावसाळ्यानंतरच्या पिकांना मिळणार पाण्याचा ओलावा
याला पर्यायी मार्ग म्हणून १) वाशी कडुन किल्ला जंक्शनकडे जाणारी वाहने आणि किल्ला जंक्शन कडून वाशीकडे जाणारी वाहने ही उर्वरित जाणाऱ्या मार्गाने (एकाच लेनवरून पामविच मार्गावर मोराज सर्कल पासून बेलापुरकडे जाणा-या वाहीनीवर दोन्ही बाजूकडील वाहतूक वळविण्यात येत आहे.) पामबीच मार्गावरून इच्छीत स्थळी जातील तसेच येतील. तसेच पर्याय २) सायन-पनवेल हायवे उरणफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील तसेच येतील. सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.