नवी मुंबई : दिलेला अभ्यास नीट करत नाही म्हणून रागाच्या भरात शिकवणी शिक्षिकेने अमानुष पणाचा कहर करीत एका साडेतीन वर्षीय चिमुरडीला उलतणे गरम करून चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बाल अत्याचार कलमान्वये शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिला अद्याप अटक करण्यात आले नाही.
हेही वाचा <<< दोनशे ट्रान्सजेंडर करणार वाशी सी सोअर ची स्वछता
साधना गायकवाड असे आरोपी महिलेचे नाव आहे. मकरंद विहार, घरकुल सोसायटी सेक्टर १५ खारघर येथे ती शिकवणीचे वर्ग घेते. याच शिकवणी वर्गात आजिनाथ बावरे यांची साडेतीन वर्षीय मुलगी शिकते. ८ तारखेला नेहमी प्रमाणे तिला पालकांनी शिकवणीला संध्याकाळी ४ वाजता सोडले व ८ वाजता घेऊन आले. मात्र तिच्या गालावर हातावर पोटारी लाल झाल्याची दिसत होती तर पीडित चिमुकलीला निटसे सांगता येत नव्हते . मात्र रात्री उशिरा या प्रकरणाचा उलगडा झाला व चटके दिल्याचे स्पष्ट झाले. पालकांनी तिच्यावर उपचार करून शिक्षिके विरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद केला. याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणाची पूर्ण शहानिशा करून पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरज कांबळे तपाधिकारी म्हणून काम पाहत आहेत अशी माहिती शिंदे यांनी दिली.