लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : न्हावा शेवा सागरी (अटलसेतु)मुळे उरणच्या चिर्ले गाव बाधित आहे. या ग्रामपंचायतींच्या हद्दीत २० कोटी खर्चाची नागरी विकास कामे करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले आहे. मात्र ते पूर्ण न झाल्याने उदघाटनाच्या वेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये चिर्लेमधील प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदलाही अद्याप अदा करण्यात आलेला नाही. मोबादला आणि विकासकामे करण्याची आश्वासने तोंडी नकोत तर लेखी स्वरूपात हमी देण्यात टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ हा इशारा देण्यात आला आहे.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Manikrao Kokate , Manikrao Kokate Chhagan Bhujbal,
छगन भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही, माणिक कोकाटे यांची भावना

या पुलामुळे मुंबईहून २० मिनिटांत नवी मुंबईला पोहता येणार आहे. शिवडी-न्हावा शेवा लिंक रोड उभारण्यासाठी शेकडो शेतकरी, मच्छीमार बाधीत झाले आहेत. सागरी सेतूचे काम पूर्ण झाल्यानंतरही अनेक मच्छी न्हावा, न्हावाखाडी, गव्हाण, जासई, घारापुरी आदी गावातील शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला तर मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नसल्याने सर्वच संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.

आणखी वाचा-नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाची दिबांच्या जासई या जन्मूभीत स्थापना

उरण तालुक्यातील चिर्ले गावाच्या हद्दीत शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू उतरत आहे. या लिंक रोडसाठी चिर्ले गावातील शेतकऱ्यांच्याही जमीनी संपादित केलेल्या आहेत.असे प्रकल्पबाधित शेतकरीही मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहेत. या सागरी सेतूमुळे बाधीत चिर्ले गावातील ग्रामस्थांच्या हिताची विकासकामे करण्याची एमएमआरडीएने तोंडी आश्वासने दिली आहेत.यामध्ये चिर्ले, गावठाण, जांभूळ पाडा गावा दरम्यान रस्त्याचे कॉक्रीटिकरण, तलावांचे सुशोभीकरण, अंतर्गत रस्ते, नाले, गटारे आदी सुमारे २० कोटी खर्चाच्या कामांचा समावेश आहे. हा पूल चिर्ले गावातील सेतुच्या शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे एमएमआरडीए आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा चिर्ले ग्रामपंचायतीने दिला असल्याची माहिती सरपंच सुधाकर पाटील यांनी दिली.

Story img Loader