नवी मुंबई: गव्हाणफाटा वाहतुक शाखेच्या – हददीतील चिरनेर फाटा ते दिघोडा या मार्गावरील चिरनेर ब्रिज हा धोकादायक झाला आहे. सदर ब्रिजचे नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. सदर काम हे तातडीने होणे आवश्यक आहे. सदर बांधकामास परवानगी मिळालेली असुन ते काम टाटा प्रोजेक्ट लि. ही कंपनी करणार आहे. हा पूल बांधण्याचे काम अंदाजे ६ महीने चालू राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदर कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्त्याची जागा उपलब्ध नसल्याने चिरनेर फाटा ते दिघोडा या मार्गावरील वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीने चिरनेर फाटा येथे बंद करणे आवश्यक आहे. तरी गव्हाणफाटा वाहतुक शाखेच्या हददीतील चिरनेर फाटा ते दिघोडा या मार्गावरील जुना रेल्वे ब्रिज मार्गे येण्यास व जाण्यास पुर्णतः बंदी करणेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

हेही वाचा… शेतकऱ्यांनो क्षणिक सुखासाठी दलालांना जमीनी विकू नका; उरणच्या शेतकऱ्यांना जमिनी राखण्याचे आवाहन

चिरनेर फाटा ते दिघोडा या मार्गावरील जुना रेल्वे पूल मार्गे येणा-या वाहनांचे वाहतुकीस पुर्णतः बंदी करण्यात येवुन सदर मार्गावरील सर्व प्रकारचे वाहनांची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

पळस्पे कडुन येणा-या वाहनांसाठी पर्यायी मार्ग: पळस्पे – गव्हाणफाटा पूल -जंगल कट मार्गे इच्छीत स्थळी जातील.

बेलापुर (सिबीडी) कडुन येणा-या वाहनांसाठी पर्यायी मार्ग: उलवे-गव्हाण फाटा पुलावरून  वरून जंगल कट मार्गे इच्छीत स्थळी जातील. 

जासई कडुन येणा-या वाहनांसाठी पर्यायी मार्ग:  गव्हाणफाटा पूल -जंगल कट मार्गे इच्छीत स्थळी जातील.

चिरनेकडुन गव्हाणफाटा कडे येणा-या वाहनांसाठी पर्यायी मार्ग: चिरनेर वेश्वी जंगलकट, एलडी टोलनाका (जुना) – – – – – चिलें धुतुम – आयओटीएल पंप युटर्न घेवुन ईच्छीत स्थळी जातील.

चिलें मार्गे दिघोडे कडे जाणा-या वाहनांसाठी पर्यायी मार्ग: चिलें ते दिघोडे फक्त अवजड वाहनासाठी एकेरी मार्गाने ईच्छीत स्थळी जातील.

सदरची अधिसुचना ३ ऑक्टॉम्बर रात्री १  ते २ एप्रिल रात्री १२ पर्यंत असणार आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chirner bridge will be newly constructed and the traffic route has been changed dvr
Show comments