उरण : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीचा फटका ऐतिहासिक चिरनेर गावाला बसला असून पुरामुळे गावातील ३५० पेक्षा अधिक घरात पाणी शिरले आहे. गावाला लगतच्या डोंगर,दऱ्यातून आलेला पाण्याचा प्रवाह गावात शिरल्याने एकच हाहाकार माजला. यामुळे गावातील घरांना तीन ते चार फूट पाणी साचल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले आहे.
तर ,वीज उपकरणे ही नादुरुस्त झाली आहेत. गावातील नैसर्गिक नाले व प्रवाह बंद केल्याने दरवर्षी चिरनेर मध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे. चिरनेर गावात पूर आला असून १५० पेक्षा अधिक घरांना पाणी शिरले असल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली,