पंचतारांकित हॉटेलांसाठी भूखंडांचा शोध सुरू; सिडकोला अब्जावधींच्या उत्पन्नाची आस

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणीपूर्वीच सिडको प्रशासनाने पंचतारांकित हॉटेलांच्या उभारणीसाठी भूखंडांची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी स्वत पुष्पकनगर, खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर आणि कळंबोली सर्कल येथे भूखंड पाहण्यास सुरुवात केली आहे. येत्या चार महिन्यांत या भूखंडांची निविदाप्रक्रिया पूर्ण करून ते विकण्यासाठी सिडकोने प्रयत्न सुरू केले आहेत. हॉटेल उद्योगातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बडय़ा कंपन्यांनी यामध्ये भाग घ्यावा म्हणून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यातून सिडकोच्या तिजोरीत अब्जावधी रुपये जमा होणार असून त्यामुळे कळंबोली, पुष्पकनगर व कामोठेमध्ये जागांचा भाव वधारण्याची शक्यता आहे.

Image Of passengers
Mumbai-Prayagraj Flight Fare : महाकुंभमुळे विमान प्रवास १६२ टक्क्यांनी महागला, जाणून घ्या मुंबई-प्रयागराज विमानाचे तिकीट दर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Forest Minister Ganesh Naik assurance regarding the name of Navi Mumbai International Airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर
commercial complex on thane east satis will open in one and a half years
ठाणे पुर्व सॅटीसवरील व्यापारी संकुल दिड वर्षात खुले होणार; व्यापारी संकुलातील आठ मजले रेल्वे देणार भाड्याने
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता

खारघर येथील एका निवासी व व्यापारी संकुलाच्या भूखंडाचा भाव सिडकोच्या निविदा प्रक्रियेनंतर प्रति चौरस मीटरला ८५ हजार रुपये झाल्याची चर्चा होती. एवढी मोठी रक्कम मोजून बांधकाम व्यावसायिकांनी ही भूखंडखरेदी केल्याने सिडकोच्या जमिनीने गगनचुंबी दर गाठल्याची चर्चा होती. नोटाबंदीनंतर सिडको क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये मंदीचे सावट असले तरी, कोणत्याही गुंतवणूकदाराने अथवा विकासकाने आपले दर अद्याप नीचांकीच्या आलेखात नेलेले नाहीत. सिडको प्रशासनाने याच दरांवर आपली तिजोरी भरण्याचा इरादा कायम ठेवल्याचे दिसते.

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीपूर्वी विमानतळापासून १५-२० मिनिटांच्या अंतरावरील तीन भूखंड पंचतारांकित हॉटेलांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. शीव-पनवेल महामार्गालगत कळंबोली सर्कल येथे वाहतूक पोलीस चौकीच्या मागील बाजूस असणाऱ्या १६ हजार चौरस मीटर, खांदेश्वर रेल्वेस्थानकाच्या समोरील सेक्टर २५ येथील भूखंड क्रमांक ३० ते ३३ यावरील १२ हजार चौरस मीटर, तसेच पुष्पकनगर येथील सेक्टर ५ मधील भूखंड क्रमांक १ वरील दहा हजार चौरस मीटर असे हे तीन भूखंड आहेत. यापैकी कळंबोली सर्कल येथील भूखंडावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटवणे ही सिडको प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. सुमारे १ लाख प्रति चौरस मीटरप्रमाणे सिडको प्रशासन या हॉटेलसाठीचे राखीव भूखंड विकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सिडकोने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या सोयीचा विचार करून पंचतारांकित हॉटेलांसाठी भूखंडांचे नियोजन सुरू केले आहे. विमानतळापासून काही अंतरावर सर्व सुखसोयींनी युक्त अशी अद्ययावत हॉटेल उभारण्यात यावीत, म्हणून सिडको प्रयत्नशील आहे. सध्या पनवेल परिसरात अशा बडय़ा पंचतारांकित हॉटेलांची कमतरता आहे. विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी जो वेळ लागेल, त्या दरम्यान पंचतारांकित हॉटेल तयार व्हावीत आणि विमानतळ सुरू होताच प्रवाशांसाठी ही सोय उपलब्ध व्हावी म्हणून सिडकोने पुढाकार घेतला आहे. व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या भूखंडांची पाहणी केली असून या भूखंडांची निविदा प्रक्रिया पार पाडण्याचे आदेशही त्यांनी मार्केटिंग विभागाला दिले आहेत. हॉटेलांसाठी देण्यात येणाऱ्या भूखंडांच्या भाडेपट्टय़ातून मिळणाऱ्या महसुलाचा लाभ सिडको क्षेत्रातील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी होणार आहे.

– डॉ. मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको

Story img Loader