उरण : द्रोणागिरी नोड मध्ये सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने गुरुवारी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. मात्र शुक्रवारी त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत व्यवसाय सुरू झाले आहेत. यातील अनेक दुकाने ,टपऱ्या आणि व्यवसाय पुन्हा नित्याने सुरू करण्यात आले आहेत. तर त्याच ठिकाणी नव्याने बांधकामे उभारणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कारवाई नंतर काय असा सवाल नागरीकांकडून केला जात आहे. सिडकोच्या द्रोणागिरी नोड मधील कारवाईमुळे येथील अनेक टपऱ्या व दुकानांनी व्यापलेले पदपथ मोकळे झाले आहेत. त्यामुळे रहिवाशांकडून या करवाईचे स्वागत करण्यात आले होते. मात्र सिडकोने काही ठराविकच दुकाने,टपऱ्या हटविल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्वरित वर का कारवाई केली नाही,असा प्रश्न येथील स्थानिक व्यावसायिकांनी केला आहे. सिडकोने यापूर्वी ही द्रोणागिरी नोड मध्ये अनेक कारवाया केल्या आहेत. मात्र कारवाई नंतर येथील अनधिकृत बांधकाम कायम आहेत. त्यामुळे सिडकोच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाई नंतर सिडकोने आशा प्रकारची अनधिकृत बांधकामे होऊ नयेत यासाठीची कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्या कडून प्रतिसाद दिला गेला नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco antiunauthorized construction team takes action against unauthorized construction in dronagiri node amy