नवी मुंबई : सिडको महामंडळाने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेतून २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेला अजून १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सिडको प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या योजनेसाठी ११ डिसेंबर म्हणजेच बुधवारपर्यंत अर्जनोंदणीची अंतिम मुदत आहे. परंतु, अर्ज नोंदणीसाठी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी ही मुदतवाढ मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अद्याप सिडको प्रशासनाने यावर अंतिम निर्णय घेतला नसला तरी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे यावर बुधवारी निर्णय घेतील असे सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे.

‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या सोडत प्रक्रियेत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या विविध नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता २६ हजार घर सोडत प्रक्रियेतून नागरिकांना मिळणार आहेत.

Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
devendra fadanvis
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण; ‘एमआयडीसी’च्या भूखंडांबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश
Shelu and Wangani housing project opposed by mill worker
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
Mumbai, Increase in PM 2.5 levels,
मुंबईत पीएम २.५ च्या पातळीत वाढ
Metro Project, Devendra Fadnavis, Metro Project Works,
मेट्रो प्रकल्प कामांचे वेळापत्रक करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
Ramdas Athawale Devendra Fadnavis Mayor post pune corporation
‘ उपमहापौर’ केले आता ‘ महापौर’ करा, रामदास आठवलेंची मागणी ! मंत्रीमंडळात स्थान देऊन देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळावा
In December Mumbai sold over 12 000 houses generating Rs 1116 crore in stamp duty
वर्षभरात मुंबईतील सव्वा लाखांहून अधिक घरांची विक्री, राज्य सरकारच्या तिजोरीत १२ हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा

हेही वाचा…फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ११ नोव्हेंबरला या योजनेच्या अर्जदारांसाठी महिन्याभराची मुदतवाढ दिली होती. ११ डिसेंबरला ही मुदत संपत असल्याने आणखी काही दिवस मिळावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अजूनही पनवेल महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नावनोंदणीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत ज्या नागरिकांची नावनोंदणी आहे, अशांना अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळवता येईल. या योजनेत आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधिक अर्जदारांनी नावनोंदणी केली असून अर्जनोंदणीचे शुल्क भरण्याचा प्रतिसाद चांगला आहे.

हेही वाचा…फ्लेमिंगोंच्या आगमनाची प्रतीक्षाच

भाड्याच्या घरात अनेक वर्षे राहणाऱ्यांना ही संधी असली तरी सिडकोच्या घरांचे लाभार्थी होण्यापूर्वीच अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, प्रधानमंत्री आवास योजनेत नावनोंदणी अशा विविध सरकारी कागदपत्रांच्या अटीमुळे ही कागदपत्रे मिळविण्यासाठी धावपळ होत आहे. त्यामुळे योजनेस सिडकोने मुदतवाढ दिल्यास बरे होईल. राजेंद्र सुर्वे, नागरिक, नवीन पनवेल

Story img Loader