पनवेल: सिडको महामंडळामध्ये मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रीयेला चालना मिळाली आहे. ९ डिसेंबरपासून सिडको मंडळातील २३ लेखा लिपीक पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध झाली असून या भरती प्रक्रियेत ८ जानेवारीपर्यंत फक्त उमेदवार ऑनलाईनपद्धतीने अर्ज करु शकतील. या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण होणा-या उमेदवारांना २५,५०० ते ८१,१०० इतके वेतन व भत्ते मिळणार आहेत. यासाठी शैक्षणिक अर्हता बी. कॉम, अकांऊंट्समध्ये बी.बी.ए., फायनानशीअल मॅनेजमेंट, कॉस्ट अकाऊंटींग, मॅनेजमेंट अकाऊंटींग, ऑडीटींग असे शिक्षण घेतलेल्यांना ही संधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२० मिनिटांमध्ये २०० गुणांची ही ऑनलाईन पद्धतीने होणा-या परिक्षेत मराठी, इंग्रजी, आकलन क्षमता, व्यावसायिक ज्ञान या प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी ५० प्रश्न विचारले जातील. तसेच व्यावसायिक ज्ञानामध्ये १०० गुण तसेच आकलन क्षमता विषयात ५० गुण आणि मराठी व इंग्रजीत प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न विचारले जातील.

हेही वाचा… जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलप्रवासात बदल, ११ ते १४ डिसेंबर या कालावधीसाठी गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार

लेखा विभागातील संवर्ग पदांसाठी व्यवसायिक ज्ञान विषयासाठी आर्थिक लेखा, खर्च लेखा, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, वित्तिय व्यवस्थापन या अभ्यासक्रमातील प्रश्न विचारले जातील. ही परिक्षा देण्यासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०६२ रुपये तसेच खुला प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. https://ibpsonline.ibps.in/cidcoacjune23/ या संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येतील.