इंन्टरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर सही देण्यासाठी १५ हजाराची लाच मागणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर नवी मुंबई लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे तर एक निवृत्त अधिकारी आहे.सिडको पनवेल कार्यालयात कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता प्रकाश मोहिले आणि निवृत्त निवृत्त सहाय्यक कार्यकारी अभियंता संजय डेकाटे यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. यातील तक्रारदार हे सब कॉन्टक्टर असुन त्यांनी नवीन पनवेल येथील सिडको नोडल ऑफिसचे संरचनात्मक दुरुस्ती केलेल्या कामाचे देयक मंजुरी करीता आवश्यक इंन्टरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर मोहिले यांची स्वाक्षरी आवश्यक होती. मात्र यासाठी मोहिले यांनी १५ हजाराची लाच मागितली. या बाबत तक्रारदार यांनी १५ तारखेला लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.
हेही वाचा >>> नवी मुंबई : तृतीयपंथीयांच्या स्वच्छतेची विक्रमी नोंद
तक्रार प्राप्त झाल्यावर १६ तारखेला शासकीय पंचासमक्ष केलेल्या लाचेच्या सत्यता पडताळणी कारवाई दरम्यान मोहिले यांनी तक्रारदार यांचे वर नमुद इंन्टरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर स्वाक्षरी करण्याकरीता त्यांना पाहिजे असलेल्या लाचेच्या रकमे संदर्भात डेकाटे यांच्याशी बोलणी करण्याबाबत सांगितल्याचे निष्पन्न झाले. २० तारखेला शासकीय पंचासमक्ष केलेल्या लाचेच्या सत्यता पडताळणी कारवाई दरम्यान डेकाटे यांनी त्याना मोहिले यांनी सांगितल्यानुसार १५ हजाराची लाचेच्या रक्कमेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केल्याची खात्री लाच लुचपत विभागाने केली.त्यानुसार लाच लुचपत विभागाने शुक्रवारी सापळा रचला. या सापळ्यात मोहिले यांनी प्रोत्साहान दिल्यानुसार डेकाटे यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम १५ हजार स्विकारताना नविन पनवेल, सिडको कार्यालय येथे संध्याकाळी ४ च्या सुमारास डेकाटे यांना रंगेहाथ पकडयात आलेले आहे. त्यांनतर मोहिले यांना नविन पनवेल सिडको कार्यालयातुन ताब्यात घेतले आहे. अशी माहिती लाच लुचपत विभागाने दिली.