सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने गुरुवारी द्रोणागिरी नोड मधील नवीन शेवा गावा जवळील चौकातील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामावर कारवाई करीत त्यावर हातोडा चालविला. यामध्ये भाजी ,चहाची टपरी,टायर दुरुस्तीचे दुकान तसेच एका भंगाराच्या दुकानाचाही समावेश आहे. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने ही कारवाई पावसाळ्यात केल्याने टपरी धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पक्क्या बांधकामांना हात न लावता आमच्यावरच कारवाई का केली असा सवालही केला आहे.

सिडकोच्या वतीने द्रोणागिरी नोड मध्ये तात्पुरत्या स्ट्रक्चर ( बांधकाम) वर कारवाई केल्याची माहिती सिडको कडून देण्यात आली आहे.अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने या पूर्वीही आशा प्रकारच्या अनेक बांधकामांवर कारवाई केली आहे. मात्र या कारवाई नंतर त्याच जागी पुनः एकदा ही बांधकामे करून व्यवसाय सुरू असल्याची अनेक उदाहरणे उरण मध्ये आहेत.

Story img Loader