नवी मुंबई : सिडको महामंडळा २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेत आतापर्यंत एक लाखांहून अधिक अर्ज नोंदणी इच्छुकांनी केली आहे. परंतु घरांचे दर सिडकोने जाहीर न केल्याने सिडको घरांचे किती दर आकारणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. सिडको मंडळाच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार मंगळवारी दुपारी किंवा बुधवारपर्यंत या दोन दिवसात घरांचे दर सिडको जाहीर करण्याच्या हालचाली सिडकोत सुरू आहेत. सिडकोने घरांचे दर जाहीर केल्यास अनेक महिन्यांपासूनच्या अर्जदारांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१० जानेवारीपर्यंत सिडको मंडळाच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी करु शकतील. प्रधानमंत्री आवास योजनेतून २६ हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध आहेत. ही घरे महाग असतील अशी अफवा पसरवली जात होती. मात्र सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी विकसक विक्री करत असलेल्या आणि बाजारभावापेक्षा या घरांच्या किंमती कमी असणार असल्याचे समजते.

हेही वाचा – Navi Mumbai International Airport: विमानतळ नवी मुंबईत, फायदा पुणेकरांचा! लोहगावपेक्षा या विमानतळाला प्राधान्य का?

हेही वाचा – Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळावर ‘या’ तारखेपासून विमान उड्डाणं होणार सुरू; मुहूर्त ठरला!

सोमवारी सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या दराबाबत कोणताही निर्णय मंडळाने घेतला नाही. परंतु मंगळवारी किंवा बुधवारी यावर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे त्यांचा निर्णय जाहीर करतील असे समजते. संबंधित सोडतीच्या प्रक्रियेमध्ये अर्जनोंदणीसाठी इच्छुक https://cidcohomes.com सिडकोच्या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतील. अधिक माहितीसाठी ९९३०८७०००० व ८०६२३६८००० या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करू शकतील.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco house rates navi mumbai information ssb