नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६८ हजार इच्छुकांनी या महागृहनिर्माणात घर मिळावे यासाठी अर्जनोंदणी केली आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणीची अखेरची मुदत सिडकोने जाहीर केल्यामुळे अखेरचे सात दिवस इच्छुकांसाठी शिल्लक आहेत.   म्हाडाने नूकत्याच काढलेल्या २ हजार घरांच्या सोडतीमध्ये तब्बल १ लाखांहून अधिक अर्जदारांनी सहभाग घेतला होता. मात्र सिडको महामंडळाने दस-याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या २६ हजार घरांच्या जाहीर केलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या किंमती अजूनही जाहीर न केल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम कायम आहे. पहिल्याच दिवशी या योजनेत २४ तासांतच १२,४०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सर्वाधिक अर्जनोंदणी होईल अशी अपेक्षा सिडकोच्या पणन विभागाला होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) या दोन उत्पन्न गटात सिडकोचे संकेतस्थळ https:\.cidcohomes.com यावर हे अर्ज नोंदणी होत आहेत. 

नवी मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये सिडको मंडळाने ६७ हजार घऱांचे बांधकाम हाती घेतले आहे. याच घरांपैकी पहिल्या टप्प्यांतील २६ हजार घरे ग्राहकांना उपलब्ध केली आहेत. यातील निम्मी म्हणजे सूमारे १३ हजार घरे तळोजा परिसरात आहेत. अपुरा पाणी पुरवठा, हवेतील  प्रदूषण आणि दळणवळणाचे मेट्रो वगळता इतर पर्याय कमी असल्याने तळोजातील घरांना कमी प्रतिसाद मिळत आहे. सिडको मंडळाने परिवहन केंद्रित विकास तथा ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट या संकल्पनेवर या घरांची निर्मिती केली आहे. रेल्वे स्थानके, बस स्थानके व मेंट्रो स्थानकांच्या जवळच ही घरे बांधली जात असल्याने या घरांसाठी सर्वाधिक अर्ज येतील अशी सिडकोची अपेक्षा आहे. 

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
congress leader anil kaushik join bjp
अनिल कौशिक यांच्या बंडा नंतर काँग्रेस भवना बाहेर; पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष
in navi mumbai cidco Contractor officials faced villagers anger after arriving to start work in Devad on Wednesday
नैना प्रकल्पाचे काम करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना पिटाळले
Ganesh Naik on Anand Dighe
Ganesh Naik: ‘माझे विरोधक स्वर्गवासी झाले, एकही जिवंत नाही’, भाजपा नेत्याच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा…अनिल कौशिक यांच्या बंडा नंतर काँग्रेस भवना बाहेर; पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष

u

सोडतीची वैशिष्ट्ये

ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी असून, प्रधान मंत्री आवास योजनेच्या अनुदानाचा लाभही घेता येईल.
योजनेविषयी सर्वप्रकारची माहिती सिडकोच्या https:\.cidcohomes.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Story img Loader