नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६८ हजार इच्छुकांनी या महागृहनिर्माणात घर मिळावे यासाठी अर्जनोंदणी केली आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणीची अखेरची मुदत सिडकोने जाहीर केल्यामुळे अखेरचे सात दिवस इच्छुकांसाठी शिल्लक आहेत. म्हाडाने नूकत्याच काढलेल्या २ हजार घरांच्या सोडतीमध्ये तब्बल १ लाखांहून अधिक अर्जदारांनी सहभाग घेतला होता. मात्र सिडको महामंडळाने दस-याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या २६ हजार घरांच्या जाहीर केलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या किंमती अजूनही जाहीर न केल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम कायम आहे. पहिल्याच दिवशी या योजनेत २४ तासांतच १२,४०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सर्वाधिक अर्जनोंदणी होईल अशी अपेक्षा सिडकोच्या पणन विभागाला होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) या दोन उत्पन्न गटात सिडकोचे संकेतस्थळ https:\.cidcohomes.com यावर हे अर्ज नोंदणी होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा