नवी मुंबई : अॅमेझॉन या कंपनीच्या जाहिरातींचे रेटिंग करा आणि घरबसल्या लाखो रुपये कमवा अशा आशयाच्या जाहिरातीला बळी पडून एका व्यक्तीची ८ लाख ३२ हजार ६४८ रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.
कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने समाजमाध्यमात पाहिली होती. यातील लिंक त्यांनी उघडली आणि संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. टेलिग्राम या समाजमाध्यमात बीऑन्ड दिनेश, अलींना इथिनोस मार्केटिंग लिमिटेड कंपनी प्रतिनिधीने त्यांना माहिती दिली. रेटिंग दिल्यावर काही वेळात त्यांना किती पैसे मिळाले हे केवळ दिसत होते.
त्यात तुम्ही आगाऊ रक्कम भरली तर हाच दर दुप्पट होईल, त्यानंतर विविध कर भरा असे सांगत केवळ चार दिवसात त्यांच्याकडून ८ लाख ३२ हजार ६४० विविध खात्यांवर मागवून घेतले. परतावा मिळाला नाही तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.