जगातील विविध देशांचे राजदूतावास आणि त्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांची वसाहत एकाच ठिकाणी असावी, या उद्देशाने सिडकोने चार वर्षांपूर्वी ऐरोली येथील सेक्टर-१० अ मध्ये २७ हेक्टर जमिनीवर तयार केलेला आंतरराष्ट्रीय राजदूतावासाचा विकास आराखडा बारगळला असून सिडकोने तो अडगळीत टाकल्यात जमा आहे. खाडीकिनारी व पामबीच टप्पा क्रमांक दोनला लागून असलेल्या या विस्तीर्ण अशा जमिनीवर अलीकडे अतिक्रमण वाढू लागले आहे.मुंबईत विविध देशांचे व जागतिक संघटनांचे राजदूतावास आहेत. देशांच्या नावलौकिकास शोभेल अशा प्रकारे ह्या जागा विकत किंवा भाडय़ाने घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या विशेषत: दक्षिण मुंबईत असलेले हे राजदूतावास विखुरलेले आहेत. राज्य सरकारने यातील काही देशांना वांद्रे कुर्ला संकुलात राजदूतावासासाठी भूखंड दिलेले आहेत. त्याच धर्तीवर सिडकोने ऐरोली-मुलुंड खाडी पुलाजवळ एक २७.३ हेक्टरचा भूखंड विकसित केला असून विविध ३८ देशांचे राजदूतावास तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी नागरी वसाहती, क्लब हाऊस व शैक्षणिक संकुलासाठी जमीन राखून ठेवली आहे. कोकण विभागीय आयुक्तालयाचे एक माजी आयुक्तांच्या चिरंजीवाने हा विकास आराखडा तयार केला असून येथील गटार, रस्ते यावर सिडकोने दहा कोटी रुपये खर्च केलेले आहेत. अडीच ते चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे हे भूखंडांना ‘स्टेट ऑफ द आर्ट’ सुविधा प्रदान करण्यात आली होती. प्रत्येक देशाला त्यांच्या परंपरा व पसंतीनुसार आराखडा तयार करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार सिडकोने या प्रकल्पाची जाहिरातदेखील केली होती. त्यानुसार दक्षिण आफ्रिका, कॅनडा, सिंगापूर ,दुबई यांसारख्या चार देशांनी यात रस दाखविला होता, पण इतर देशांनी त्याकडे पाठ फिरवली.  माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी या प्रकल्पाचा तीन वर्षांत आढावा घेतला नाही. त्यामुळे या विस्तीर्ण अशा जमिनीवर एखादा उच्चभ्रू लोकवस्तीचा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव नियोजन विभागाने तयार केला असून हा प्रकल्प बारगळल्यात जमा आहे. एमआयडीसीत असताना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी या प्रकल्पाबाबत काय निर्णय घेतात याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दुतावास विखुरलेले

मुंबईत विविध देशांचे व जागतिक संघटनांचे राजदूतावास आहेत. देशांच्या नावलौकिकास शोभेल अशा प्रकारे ह्या जागा विकत किंवा भाडय़ाने घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या विशेषत: दक्षिण मुंबईत असलेले हे राजदूतावास विखुरलेले आहेत.

Story img Loader