उरण : सिडको परिसरातील नागरी वसाहतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी द्रोणागिरी नोड मध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याकरिता जेएनपीटी कामगार वसाहती समोरील सेक्टर ११ व बोकडवीरा शिर्के वसाहत नजीकच्या सेक्टर – ३० येथे भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या भूखंडावर सिडकोने फलक लावले आहेत.कचराभूमी अभावी संपूर्ण  उरणमध्ये जागोजागी कचऱ्याचे डोंगर उभे झाले आहेत. त्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि हा कचरा नष्ट करण्यासाठी त्याला लावण्यात येणाऱ्या आगीमुळे होणारे हवेतील प्रदूषण याचा त्रास ही उरणच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. उरण नगरपरिषद तसेच तालुक्यातील ३५ ग्रामपंचायती आणि सिडकोच्या द्रोणागिरी नोडच्या माध्यमातून वाढणारी नागरी वस्ती यामध्ये निर्माण होणारा दररोजच्या कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.कचराभूमीचा प्रश्न सोडविण्यात प्रशासन अयशस्वी : मागील अनेक वर्षे उरणमध्ये कचराभूमीचा प्रश्न ऐरणीवर आहे. यासाठी उच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. तरीही उच्च पातळीवर प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. ही स्थिती अनेक वर्षे असतांना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उरण मधील कचरा आणि कचराभूमीची समस्या गंभीर झाली आहे.

ग्रामपंचायतीची सिडको कडे भूखंडाची मागणी : उरण मधील अनेक ग्रामपंचायतीच्या कचराभूमीसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून सिडकोकडून भूखंडाची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी काही विभागात सिडकोने भूखंड ही आरक्षित केल्याचे पत्र पंचायत समितीला दिले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे.सिडकोने द्रोणागिरी नोड मध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कामही सुरू आहे. हा प्रकल्प येत्या महिन्याभरात सुरू होणार असल्याची माहिती सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावसकर यांनी दिली. तर उरणच्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
leakage from main water pipeline schedule for water supply disrupts in bandra
मुख्य जलवाहिनीतून गळती; वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी विशेष वेळापत्रक
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
Story img Loader