उरण : सिडको परिसरातील नागरी वसाहतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी द्रोणागिरी नोड मध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याकरिता जेएनपीटी कामगार वसाहती समोरील सेक्टर ११ व बोकडवीरा शिर्के वसाहत नजीकच्या सेक्टर – ३० येथे भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या भूखंडावर सिडकोने फलक लावले आहेत.कचराभूमी अभावी संपूर्ण उरणमध्ये जागोजागी कचऱ्याचे डोंगर उभे झाले आहेत. त्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि हा कचरा नष्ट करण्यासाठी त्याला लावण्यात येणाऱ्या आगीमुळे होणारे हवेतील प्रदूषण याचा त्रास ही उरणच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. उरण नगरपरिषद तसेच तालुक्यातील ३५ ग्रामपंचायती आणि सिडकोच्या द्रोणागिरी नोडच्या माध्यमातून वाढणारी नागरी वस्ती यामध्ये निर्माण होणारा दररोजच्या कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.कचराभूमीचा प्रश्न सोडविण्यात प्रशासन अयशस्वी : मागील अनेक वर्षे उरणमध्ये कचराभूमीचा प्रश्न ऐरणीवर आहे. यासाठी उच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. तरीही उच्च पातळीवर प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. ही स्थिती अनेक वर्षे असतांना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उरण मधील कचरा आणि कचराभूमीची समस्या गंभीर झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा