लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उरण: तालुक्यातील मोठीजुई परिसरातील अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या गोदामावर मंगळवारी सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ बाधीत क्षेत्र(नैना)विभागाने कारवाई केली. यावेळी सिडकोने प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

आणखी वाचा-करळ ते सिंगापूर बंदर उड्डाणपुलाचे काम पूर्ण; ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला करणार

सिडकोने नवी मुंबई विमानतळ बाधीत क्षेत्र घोषित केले आहे. या परिसरात बांधकाम करीत असतांना सिडकोच्या नैना प्राधिकरणा ची परवानगी घेणे आवश्यक आहे. मोठीजुई येथील भूखंडा वर कलिम व आरिफ शहा यांनी सिडकोच्या सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय बेकायदा बांधकाम केले होते. या संदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियमन १९६६ च्या कलम ५४ (१) नुसार नैना विभागाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक यांनी नोटीस बजावली होती. तरीही बांधकाम सुरू असल्याने मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. यावेळी नवनीत सोनवणे, सिडको (नैना) अनधिकृत बांधकाम मुख्य नियंत्रक प्रताप नलावडे व प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.