जगदीश तांडेल, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उरण : सिडकोने २००८ मध्ये जासईत दिवसाला पाच मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प उभारला होता. सध्या हा प्रकल्पच कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. या प्रकल्पाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकून नवीन कचराभूमी निर्माण करण्यात आली आहे. जासई गावातील हा घनकचरा प्रकल्प २०१९ पासून बंद करण्यात आला आहे. या प्रकल्पात दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत होती. मात्र प्रकल्प बंद झाल्याने जासई आणि परिसरात कचऱ्याचे ढीग साचू लागली आहेत.

कचराभूमीच्या अभावाने उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील ३५ ग्रामपंचायत हद्दीत दररोज निर्माण होणाऱ्या ४० टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचराभूमीची व्यवस्था नाही. त्यामुळे हवेत दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या,ओला-सुक्या कचऱ्याचा समावेश असतो.दररोज जमा होणारा कचरा जमा करण्यासाठी काही ग्रामपंचायतीकडे कचरा कुंड्यांच नव्हे तर वाहतुकीची साधनेही नसल्याचे आढळून आले आहे.तर काही मात्र ग्रामपंचायतींकडे कचराकुंड्या,घंटागाड्या,ओला-सुका कचरा वाहून नेण्यासाठी बंदिस्त कचरा गाड्याही उपलब्ध आहेत. मात्र कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीसाठी एकही डंपिंग ग्राउंड उपलब्ध नाही.त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त कचरा टाकला जात आहे.कधी खाडी किनाऱ्यावरील खारफुटी, कांदळवनावर तर गावाबाहेरच्या एखाद्या रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे.काही ग्रामपंचायतीकडे कचरा टाकण्यासाठी पर्यायच उपलब्ध नसल्याने कचरा जाळून नष्ट केला जातो. तालुक्यातील एक दोन ग्रामपंचायतीने हद्दीतील कंपनीच्या आर्थिक साहाय्य घेऊन घनकचरा व्यवस्थापन प्लाण्टची उभारणी केली

आणखी वाचा-करळ ते जासई दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्याचा दिवसाही लखलखाट

सिडकोने डंपिंग ग्राऊंडसाठी बोकडवीरा,नवघर, डोंगरी, नागाव, पागोटे या ठिकाणी भुखंड आरक्षित ठेवले आहेत. प्रत्यक्षात अनेक वर्षांपासून डंपिंग ग्राउंड फक्त कागदावरच आहे. सिडकोच्या अक्षम्य होणाऱ्या दिरंगाईमुळे डंपिंग ग्राउंडअभावी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सांडपाणी, कचरा व्यवस्थापनाची समस्याही तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी डोकेदुखी ठरत आहे.

जासई येथील सिडकोचा घनकचरा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हा प्रकल्प जासई ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे द्रोणागिरी नोड मध्ये एक नवीन घनकचरा प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर यांनी दिली आहे.

फायद्याचा घनकचरा प्रकल्प

घनकचरा प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण होते. हे खत ४ रुपये किलो दराने विकले जाते. त्याचप्रमाणे या प्रकल्पामुळे काहींना रोजगार ही उपलब्ध होतो. त्यामुळे फायदेशीर असलेला हा प्रकल्प बंद कसा झाला असा सवाल नागरिक करीत आहेत.

द्रोणागिरीत नवे प्रक्रिया केंद्र

येत्या आठवड्याभरात उरण मध्ये नव्याने उभ्या राहणाऱ्या द्रोणागिरीच्या नागरीवस्तीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.