शहराला जोडणाऱ्या मार्गाचे सिडकोकडून रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याला नव्याने पदपथ बनविण्यात आले आहेत. या रुंदीकरण झालेल्या रस्त्याच्या पदपथावर फेरीवाल्यांनी कब्जा करून ताबा घेतला आहे. त्यामुळे उरण शहरात प्रवेश करणारे व शहरातून जाणारे नागरिक येथील रस्त्याचाच वापर करीत असल्याने या मार्गावर वाहनांची कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नवी मुंबई : तुर्भे वाहतूक पोलीस भोगताहेत नरकयातना

उरण नगरपरिषद व ग्रामपंचायत यांच्या हद्दीतील वादामुळे अनेक वर्षे उरण चारफाटा ते उरण नगरपरिषद हद्द यामधील रस्ता खड्डे व कोंडी या समस्यांना सामोरे जावे लागत होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सिडकोच्या माध्यमातून उरण चारफाट्याच्या विकासाचे काम हाती घेऊन या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्याचे रुंदीकरण करून ही समस्या दूर न होता या मार्गावरील कोंडीत अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे पदपथ मोकळे करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली आहे.