नवी मुंबई : करोना काळापासून निवडणूक लांबणीवर पडत असल्याने साडेचार वर्षांपासून नवी मुंबई मनपामध्ये प्रशासनराज आहे. याचा फायदा घेत विकासकामांच्या गोंडस नावाखाली भरमसाट कामे केली जात असून यात अनावश्यक कामांना प्राधान्य दिले जात आहे. याबाबत आमदार, माजी नगरसेवक सामाजिक संस्था तसेच अनेक जागरूक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र तरीही राजरोसपणे ही कामे सुरू आहेत.

नवी मुंबई शहरात शंभरहून अधिक ठिकाणी सध्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असून त्याबरोबरच तेवढीच कामे निविदा प्रक्रियेत आहेत. हे चित्र एखाद्या शहरासाठी सुखावह असले तरी कामाचा दर्जा आणि गरज लक्षात घेता अनेक ठिकाणी अनावश्यक कामे केली जात आहेत तर अनेक ठिकाणी कामे करण्याची नितांत गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर

आणखी वाचा-प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे

शहरातील रस्त्यांच्या डावीकडील मार्गिका डांबरीकरण केली जाते. जेणेकरून इंटरनेट, टीव्ही, फोन, विद्युत वाहिन्या टाकणे वा काढणे तसेच त्यांची दुरुस्ती ही कामे सहज व कमी पैशात केली जावीत. मात्र नवी मुंबई हे एकमेव शहर आहे ज्या ठिकाणी डावीकडील मार्गिकेवरही सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. वाशी रेल्वे स्थानक ते ब्ल्यू डायमंड चौक या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याची डावीकडील मार्गिका उखडून त्यावर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक चौकाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा घाट नवी मुंबई महापालिकेने घातला आहे.

विविध अनावश्यक कामाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तिजोरीची लूट केली जाते आहे, असा थेट आरोप अलर्ट इंडिया संस्थेने लोकायुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केला आहे. ऐरोलीत सेक्टर ३ /८, वाशी सेक्टर १४, सीबीडी अशा बहुतांश ठिकाणी पदपथांचे पेव्हरब्लॉक आवश्यक नसताना काढण्यात आले व पुन्हा तेच पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. कोपरखैरणे सेक्टर १९,१८, १७ अशा रेल्वे स्थानक परिसरातील पदपथांवरील पेव्हरब्लॉक उखडले असून अनेक ठिकाणी एक ते चार फूट खड्डे पडले आहेत, मात्र अशा ठिकाणी सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. नेरुळ स्टेट बँक कॉलनीसमोरील सुस्थितीतील पदपथ उखडून काढण्यात आलेल पेव्हर ब्लॉकच पुन्हा बसवण्यात आले आहेत. अशीच अवस्था रस्त्यांची आहे.

आणखी वाचा-ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?

पामबीच मार्गावर भरतीचे पाणी

याशिवाय पामबीच मार्गावरही कामे सुरू आहेत. आता पर्यंत पावसाळ्यापूर्वी पाम बीच रस्त्यावर डांबरी मिश्रणाचा एक थर दिला जात होता. त्यामुळे कुठेही पाणी साठणे व खड्डे पडणे असे प्रकार होत नव्हते. आता मात्र वाशीत सिमेंट काँक्रीटीकरण सुरू केले आहे. हे काम करतानाही व्यवस्थित काळजी न घेतल्याने भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. त्याचा त्रास तीन दिवस सहन करावा लागला.

शहरातील कामे नियमानुसार सुरू आहेत. एखादा रस्ता चांगल्या स्थितीत दिसत असतो, मात्र शास्त्रोक्त पाहणी केली असता तो लवकरच खराब होणार असल्याचे निदर्शनास आले तर त्यावर थर दिला जातो. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे केली जात आहे. -संजय देसाई, शहर अभियंता

रस्त्यांसाठी कोट्यवधींचा खर्च

नवी मुंबई महापालिका ही एमआयडीसीतील रस्ते बांधणी करत असून ४०७ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असून १०४ कोटींची कामे निविदा प्रक्रियेत आहेत. तर शहरांतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करताना अनेक रस्ते सुस्थितीत असताना त्यांची दुरुस्ती केली जात आहे. तर ऐरोली ते सीबीडी या परिसरात विशेषत: परिमंडळ दोनमध्ये येणाऱ्या नोडचे अंतर्गत रस्ते अद्याप खराब आहेत. ज्या ठिकाणी स्थानिक दबंग नेते आहेत त्या ठिकाणची कामे जोरात सुरू आहेत. तसेच गवळी देव डोंगरावर काही बाकडे आणि छत्र्या केवळ लावण्यात आल्या आहेत, मात्र खर्च साडेपाच कोटी रुपये दाखवण्यात आला आहे.

आणखी वाचा-बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल

अनावश्यक कामांची यादी

  • सुस्थितीतील रस्त्यांचे पुन्हा पुन्हा डांबरीकरण
  • सुस्थितीतील पदपथ, गटारे तोडून पुन्हा बांधणे
  • सुस्थितीतील विजेचे खांब बदलणे
  • तीन लाखांच्या आतील रकमेच्या अनावश्यक कामांची निविदा काढणे
  • सुस्थितीतील इमारतींमधील पाण्याच्या टाक्या पाडून बांधणे
  • पालिका इमारतींचे तसेच पाण्याच्या टाक्यांचे सुस्थितीतील कुंपण पाडणे व पुन्हा बांधणे.

मुख्यमंत्री, मुख्य सचिव, नगरविकास खात्याचे सचिव ते नवी मुंबई महापालिका प्रशासन या सर्वांकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीच्या अपव्ययाची दखल घेतली जात नसल्याने याबाबतची तक्रार लोकपाल, लोकायुक्त, केंद्रीय दक्षता आयोग यांच्याकडे केली आहे. येनकेन प्रकारेण तिजोरीची लूट या एकमेव हेतूने नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू आहे. -सुधीर दाणी, सजग नागरिक मंच, नवी मुंबई