स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात तृतीय आणि राज्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाल्यांनतर हे मानांकन उंचविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका लोक सहभागातून विविध कार्यक्रम राबविण्यावर भर देत आहेत.
या अनुषंगाने बालदिनाचे औचित्य साधून वंडर्स पार्क, नेरुळ येथे ई.टी.सी अपंग शिक्षण-प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या सहयोगाने संपन्न झालेल्या हॅपी कीडस फेस्टीव्हलला भेट दाणाऱ्या २० हजारांहून अधिक बालक पालकांमध्ये स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यात आला.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे व ई.टी.सी केंद्र संचालक डॉ. वर्षां भगत यांनी महापालिका क्षेत्रातील कचरा वेचक कर्मचारी, वाहनचालक व त्यांचे पर्यवेक्षक यांच्याशी सुसंवाद साधून दैनंदिन कचरा संकलन व उघडय़ावरील शौच समस्या यांबाबत चर्चा केली व नवी मुंबई हागणदारीमुक्त करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे आवाहन केले. कचरावेचक संकलनाबाबतचे कार्य व कर्तव्ये तसेच व्यक्तिगत व सामाजिक स्वच्छतेचा स्तर उंचविणे आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तणूक याविषयी मार्गदर्शन केले. तसेच स्वच्छ भारत जनजागृतीच्या मोहिमेच्या अनुषंगाने सुका व ओला कचरा तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा याबाबत मते जाणून घेतली व चर्चा घडवून आणली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध समाजघटकांशी सुसंवाद
मानांकन उंचविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका लोक सहभागातून विविध कार्यक्रम राबविण्यावर भर देत आहेत.
Written by मंदार गुरव
First published on: 04-12-2015 at 02:36 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clean india campaign in navi mumbai