दहा दिवसांच्या बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिल्यानंतर शनिवारी उरण पिरवाडी समुद्र किनारपट्टीवर जो केरकचरा निर्माण झाला होता तो मनसेच्या कार्यकर्त्यां गोळा केला आहे. यावेळी दोन टेम्पो कचरा गोळा करण्यात आला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून आपला समुद्र किनारा आपली जबाबदारी या मोहिमेत सहभाग घेऊन उरण व पनवेल तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ही मोहीम राबिविली.
उरण मधील पिरवाडी किनाऱ्यावर दहा दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर किनाऱ्यावर निर्माण झालेल्या कचऱ्याची सफाई करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
हेही वाचा >>> नवी मुंबई : घरफोडीतील सराईत आरोपीस अटक ; ६० तोळ्यांचे दागिने जप्त
पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर शनिवारी सकाळी ८ ते १० वाजे पर्यत उरण व पनवेल तालुका मनसेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, सचिव अविनाश पडवळ ,जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी, उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत , सचिव अल्पेश कडू पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील , उरण उप शहराध्यक्ष संजय मुरकुटे, उरण शहराध्यक्ष धनंजय भोरे , तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर , दीपक पाटील, विभाग अध्यक्ष बबन ठाकूर , गणेश तांडेल यांच्या सह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.