शौचालयातील उपकरणांची मोडतोड, सोयीसुविधांची नासधूस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई पालिका स्वच्छता सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी पालिका प्रयत्नशील असली तरी झोपडपट्टीवासीयांकडून केल्या जाणाऱ्या काही चुकीच्या प्रकारांमुळे पालिकेच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. पालिकेने उपलब्ध केलेल्या नवीन सोयीसुविधांची नासधूस केली जात असल्याने पालिकेच्या झोपडपट्टी भागातील स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे.

पालिकेतर्फे झोपडपट्टीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी नवीन नळ, विद्युत रोषणाईसाठी आकर्षक दिवे बसवण्यात आले आहे. शौचालयांचे दरवाजे बदलण्यात आले आहेत. अपंगासाठी इंग्लिश पद्धतीचे शौचालय बांधण्यात आले आहे. मात्र झोपडपट्टीतील काही समाजकंटकाकडून शौचालयाचे नळ व दरवाजे तोडणे, दिवे चोरून नेणे किंवा फोडणे, शौचालयांच्या भांडय़ांची मोडतोड करणे असे प्रकार केले जात आहेत. उघडय़ावर शौचास बसणाऱ्याकडून पालिका १२०० रुपयांचा दंड वसूल करते. तर लघवी करणाऱ्यांकडून २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केल्यास काहीजण राग मनात धरून पालिकेच्या सार्वजनिक वस्तूंचे नुकसान करत असल्याचा आरोप पालिकेच्या अधिकाऱ्याने केला.
पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या टाकीची नासधूस केल्याने टाकीतील पाणी गळत आहे.

पालिकेकडून लोखंडी नळ बसवण्यात येऊन वेल्डिंग करण्यात येत आहे. तसेच पालिका कर्मचारी अधिकारी प्रभागातील अस्वच्छतेकडे लक्ष देत आहेत.

– तुषार पवार, पालिका उपआयुक्त घनकचरा विभाग

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleanliness campaign in navi mumbai slum area become ineffective