लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वी मुंबई : वाशी येथील महाराजा भाजी व फळ मार्केट येथे सीएसआर उपक्रमांतर्गत कापडी पिशवी वेंडींग मशीन सुविधेचे लोकार्पण महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते झाले.

नवी मुंबई सिटी डॉट कॉम या सोशल नेटवर्कच्या सीएसआर उपक्रमामधून ही कापडी पिशवी वेंडिंग मशीन मार्केटच्या ठिकाणी बसविण्यात आले आहे. पुढील काही दिवसातच वाशी विभागातच आणखी दोन यंत्रे बसवण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई डॉट कॉमचे मेहुल जैन यांनी लोकसत्ताला सांगितले.

आणखी वाचा-डिजिटल शिक्षण बंद! ठेकेदाराची मुदत संपुष्टात, नवी मुंबई महापालिका शाळांमधील डिजिटल शिक्षणाचे भवितव्य अधांतरी

वाशी सेक्टर १७ येथील मार्केटमध्ये लावलेल्या वेंडिंग मशीनमध्ये १० रुपयाचे नाणे टाकल्यानंतर मशीनवरील लाल बटण दाबल्यावर त्यामधील स्वयंचलित प्रणालीव्दारे कापडी पिशवी दिली जाते. साधारणत: ५ ते ६ किलो वजन पेलू शकेल अशा क्षमतेची ही कापडी पिशवी असून जर navimumbaicity. com हे अॅप मोबाइलमध्ये मोफत डाऊनलोड करून घेतल्यास अॅपमधील कोड स्कॅन केल्यानंतर मशीनव्दारे कापडी पिशवी प्राप्त होते. आयुक्त नार्वेकर यांनी १० रुपयाचे नाणे टाकून तसेच ५ रुपयाची दोन नाणी टाकून अॅपव्दारे कोड स्कॅन करून प्रत्यक्ष पिशवी घेतली व या मशीनची कार्यप्रणाली जाणून घेतली.

नवी मुंबई सिटी डॉट कॉम या सोशल मिडीयाच्या सीएसआर उपक्रमातून कापडी वेडींग मशीन वाशी येथील मार्केटच्या ठिकाणी बसवण्यात आली असून अॅप डाऊनलोड केल्यास महिन्याला चार पिशव्या मोफत मिळणार आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने शहर प्लास्टीकमुक्त करण्याचा संकल्प असून नागरीकांनी सहकार्य करावे. -मेहुल जैन, नवी मुंबई सिटी डॉट कॉम सोशल नेटवर्क संस्थापक

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloth bag machine operational in vashi mrj