विविध रंगांचे कागद, बांबूच्या काडय़ा व नैसर्गिक रंगांच्या साहाय्याने कलाकारांनी तयार केलेल्या निसर्गचित्रांना गणेशोत्सवातील सजावटींसाठी आजही मागणी आहे. पारंपरिक मखरांची जागा सध्या झगमगत्या व आकर्षक थर्माकोल आणि फ्लेक्सच्या बॅनरने घेतली असली तरी अनेक गणेशभक्त आजही या रंगीत कापडी फलकांना पसंती देत आहेत. हे कापडी फलक पर्यावरणस्नेही असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास न करता उत्सव साजरा करण्याचा हेतूही साध्य होत आहे.
कोकणातील गावात जवळपास घरोघरी गणपती आणण्याची परंपरा आहे. अनेक घरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी खास जागा वा विशेष खोली राखीव असते. या जागी आठ महिने भाताची साठवणूक केली जाते. गणेशोत्सावात ती रिकामी करून किंवा भाताच्या साठय़ावर गणेशमूर्ती विराजमान केली जाते. गणेशोत्सावासाठी या खास राखीव ठेवण्यात आलेल्या जागेत परंपरेने अनेक जण नैसर्गिक देखावे तयार करून मखराची सजावट करतात. त्यासाठी पूर्वी चित्रकारांकडून कापडी फलकांवर निसर्गचित्र काढली जात असत. सध्या झटपट तयार होणाऱ्या फ्लेक्सच्या बॅनरची अथवा थर्माकोलच्या मखरांची चलती आहे, मात्र अनेक गणेशभक्त आजही कापडी फलकांपासून तयार केलेल्या नैसर्गिक चित्रांचीच मखरांना पसंती देत असल्याचे तरुण चित्रकार सुभाष जोशी यांनी सांगितले. यासाठी लागणारे कापड, रंग यांचे तसेच मजुरीचेही दर वाढलेले असले तरी परंपरा व निसर्गावरील प्रेमापोटी या फलकांमध्ये घट न होता त्यांची मागणी वाढल्याचेही ते म्हणाले.
गणेशभक्तांची कापडी फलकांनाही पसंती
विविध रंगांचे कागद, बांबूच्या काडय़ा व नैसर्गिक रंगांच्या साहाय्याने कलाकारांनी तयार केलेल्या निसर्गचित्रांना गणेशोत्सवातील सजावटींसाठी आजही मागणी आहे. पारंपरिक मखरांची जागा सध्या झगमगत्या व आकर्षक थर्माकोल आणि फ्लेक्सच्या बॅनरने घेतली असली तरी अनेक गणेशभक्त आजही या रंगीत कापडी फलकांना पसंती देत आहेत. हे कापडी फलक पर्यावरणस्नेही असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास न करता उत्सव साजरा करण्याचा हेतूही […]
Written by रोहित धामणस्कर
Updated:
First published on: 16-09-2015 at 10:04 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloth banner for ganesh utsav