नवी मुंबई –  नानासाहेब व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विचारांची किंमत अनमोल आहे, त्यांच्या विचारांचे व ज्ञानाचे खरे  विद्यापीठ रेवदंडा येथे असून  लवकरच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्राचा सर्वात मोठा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी नवी मुंबई येथील कार्यक्रमात आज दिली. श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला  विद्यापीठाने डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांना डी.लिट. ही पदवी बहाल केल्यामुळे खऱ्या अर्थाने त्या पदवीचा मान सन्मान वाढल्याचंही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> होळी आणि शिमग्याच्या पारंपरिक प्रथा आणि खेळांचा अस्त ? उरण मधील गावांचे निमशहरात रूपांतर

श्री जगदीश प्रसाद झांबरमाल टिब्रेवाला विद्यापीठाने श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचा वाशी येथील प्रदर्शन केंद्रात रविवारी एका विशेष दिमाखदार कार्यक्रमात  डॉक्टरेट ही पदवी बहाल करून त्यांचा सन्मान केला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री श्रीयुत आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी ,केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा ,खासदार   डॉक्टर श्रीकांत शिंदे,पूनम महाजन , कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विनोद टीब्रेवाला, तसेच  विद्यापीठाचे संचालक मंडळ, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कुटूंबीय तसेच लाखो श्री सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी या कार्यक्रम प्रसंगी सांगितले की मी आपल्याच श्री परिवारातील असून आप्पासाहेबांचे मला सदैव मार्गदर्शन लाभते .त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. चांगले काम करण्याची प्रेरणा व चांगले विचार बैठकीच्या माध्यमातून मिळतात. जेव्हा मलाही ताण येतो त्यावेळेला मी आप्पासाहेबांचे मार्गदर्शन घेतो त्यांच्या निरूपणातून चांगले विचार मिळतात सर्वसामान्यांना मदत व दिशा देण्याचे काम ते देतात. लाखो कुटुंबीय त्यांच्या पाठीशी आहेत आपले मन स्वच्छ असेल तर आपल्याला सर्व स्वच्छ दिसते ही जाणीव आप्पासाहेबांनी मला करून दिली आहे.त्यामुळे नागरिकच माझे खरे टॉनिक आहेत. त्यांच्यातूनच मला काम करण्याची प्रेरणा मिळते. आपण समाजाला काय देणार व राष्ट्राला काय देणार ही शिकवण श्री सदस्यातून प्राप्त होते. सरकार जिथे पोहोचत नाही तिथे श्री सदस्य पोहोचतात हीच या श्री सदस्याची मोठी किमया आहे. सचिन दादा हे आप्पासाहेब व नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य पुढे चालवत आहेत. लवकरच महाराष्ट्राचा सर्वात मोठा पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आप्पासाहेबांना गौरवण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रम कुठे घ्यायचा या ठिकाणाचा आम्ही शोध घेत आहोत पण लवकरच महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपसाहेबांना दिला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा >>> डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना डॉक्टरेट पदवी बहाल ; नवी मुंबईतील वाशीत दोन लाखाहून अधिक श्रीसदस्य उपस्थित

नानासाहेब धर्माधिकारी यांनी संत वाङ्मयाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाला सुरुवात केली त्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं कार्य जगासमोर आलं म्हणूनच याच कार्याचा अनेक ठिकाणी गौरव होतोय त्यामुळे श्री सचिन दादा धर्माधिकारी यांना मिळालेला पुरस्कार हा श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव करणारा असल्याच्या भावना पद्मश्री अप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांनी याप्रसंगी काढले.

आप्पासाहेब धर्माधिकारी हे ज्ञानाच विद्यापीठ आहे, आणि आज आपल्याला मिळालेली डॉक्टरेट ही पदवी नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यामुळे मिळाली. नानासाहेब धर्माधिकारी,अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळेच हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याचं श्री सचिन दादा धर्माधिकारी यांनी सांगत हा गौरव खऱ्या अर्थाने श्री सदस्यांचा असल्याचा ते आपल्या भाषणात म्हणाले.नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या कार्याचा वसा अप्पासाहेब धर्माधिकारी व श्री सचिन धर्माधिकारी चालवत आहेत त्यामुळे श्री सचिन  धर्माधिकारी यांना ही पदवी बहाल करताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू  विनोद टिब्रेवाला यांनी सांगितले. या कार्यक्रमाला श्री सदस्यांनी मोठी गर्दी केली होती.

चौकट- महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करताना सदैव सर्वसामान्य माणसाच्या विचार प्रथम करण्याचे मार्गदर्शन मला नानासाहेब व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून मिळालेला आहे काम करताना अनेक वेळा ताण येतो अनेक संकटे येतात अडचणी येतात परंतु मन स्वच्छ असेल तर दिशा नक्की मिळते यामुळेच आज महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची काम प्रामाणिकपणे करत आहे याचं खरं बोल श्री सदस्यांच्या बैठकीला जाते

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde appasaheb dharmadhikari maharashtra bhushan award zws