उरण : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबई ने थेट कोकणाला जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे भूमिपुजन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
हे ही वाचा…एपीएमसी प्रवेशद्वारावर फास्टॅग प्रणाली
३ हजार ५७ कोटी रुपयांची निविदा या पुलाच्या उभारणीसाठी मागविण्यात आली आहे. या पुलाची एकूण लांबी ही १०.२०९ किलोमीटर आहे. करंजा येथील द्रोणागिरी मंदिराच्या भक्त भवनात या दुरदृश्य प्रणालीने येथील स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. मुंबईतील सागरी सेतू मार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात हा प्रवास करता येणार आहे.