उरण : सिडकोच्या सागरी(कोस्टल)मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून ऑक्टोबर अखेर पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व वाहनचालकांना रस्त्यातील खड्डे आणि धुळी पासून दिलासा मिळणार आहे. खोपटे खाडीपूल ते जेएनपीटी पळस्पे राष्ट्रीय महामार्ग या अडीच किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांचा निधी सिडकोकडून खर्च करण्यात येणार आहे. तर ऑगस्ट महिन्यात याच मार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० लाख रुपये खर्च करूनही रस्त्यातील खड्डे जैसे थे च राहिल्याने या मलमपट्टी विरोधात प्रवाशांनी सिडको विरोधात संताप व्यक्त केला होता. उरणच्या या कोस्टल मार्गाच्या दुरावस्थेचे वृत्त लोकसत्ता ने प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सिडकोने तातडीने भर पावसात या मार्गावरील खड्डे भरण्याचे काम केले. मात्र आठ दिवसानंतर पुन्हा एकदा या महामार्गावरील खड्डे जैसे थे स्थितीत असल्याने प्रवासी व वाहनचलकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे खड्डे भरले की मलमपट्टी केली असाही सवाल केला जात आहे. या मार्गावरील खड्डे बुजविसाठी वापरण्यात आलेली खडी उखडून पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. तर अनेक ठिकाणी या रस्त्यावर खडीचे उंचवटे निर्माण झाल्याने वाहनांना खड्डे आणि उंचवटे यांचा सामना करीत धोकादायक स्थितीत वाहन हकावे लागत आहे.

उरण ते जेएनपीटी पळस्पे व बेलापूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ व ३४८ (अ) यांना जोडणारा सिडकोचा खोपटे पूल ते पंजाब गोदाम हा अडीच किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. या मार्गामुळे कमी वेळात विना अडथळा मुंबई, पनवेल आणि नवी मुंबईचे अंतर पार करता येत आहे. त्यामुळे उरण मधील खाजगी वाहनचलक व दुचाकीस्वार या मार्गाचा वापर करीत आहेत. त्याचप्रमाणे द्रोणागिरी नोड व खोपटे,कोप्रोली या परिसरातील गोदामात मालाची ने आण करणारी कंटनेर वाहने ही याच मार्गाने येत आहेत. कमी अंतरामुळे या मार्गाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. मार्गाच्या दुरुस्ती साठी सिडकोने तीन कोटींची निविदा काढली आहे. रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून प्रथमतः रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर खडी आणि डांबर यांचा थर टाकण्यात येईल.

diva vasai trains cancelled
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दिवा – कोपरदरम्यान वाहतूक ब्लॉक, दिवा – वसई रोड रेल्वेगाड्या रद्द करणार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
cr start work of widening the pedestrian bridge at Diva railway station
दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दीचा ताण कमी होणार! ;मध्य रेल्वेकडून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
Construction of 210-meter-long bridge on Bullet Train route on National Highway 48 in Gujarat completed
बुलेट ट्रेन मार्गावरील २१० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
Fast paced concreting on Madh Marve road in Malad is causing traffic congection
मढ मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास प्रतीक्षा

हेही वाचा >>>नवी मुंबई : विकास आराखड्यात हस्तक्षेपाची गरज; एक-दोन बैठका होऊनही महापालिका-सिडको यांच्यात तोडगा नाही

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन : उरण सामाजिक संस्थेने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मे महिन्यात भर उन्हात आंदोलन केले होते. त्यावेळी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे कारण सिडकोने दिले होते. तर त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने काम दुरुस्ती होऊ शकलेली नव्हती. सिडकोच्या द्रोणागिरी नोड मधील अधिकाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ : या संदर्भात सिडकोच्या द्रोणागिरी नोड मधील अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. तर सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कामाची माहिती घेऊन देतो सांगूनही माहिती दिली नाही.

जड वाहतुकीमुळे डांबरीकरण टिकणार का ?

खोपटे ते राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावरून दररोज हजारो जड कंटनेर वाहने ये जा करीत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील डांबरीकरण टिकत नसल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे डांबरीकरणा नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच स्थिती रस्त्याची होण्याची शक्यता असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

Story img Loader