उरण : सिडकोच्या सागरी(कोस्टल)मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून ऑक्टोबर अखेर पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व वाहनचालकांना रस्त्यातील खड्डे आणि धुळी पासून दिलासा मिळणार आहे. खोपटे खाडीपूल ते जेएनपीटी पळस्पे राष्ट्रीय महामार्ग या अडीच किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांचा निधी सिडकोकडून खर्च करण्यात येणार आहे. तर ऑगस्ट महिन्यात याच मार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० लाख रुपये खर्च करूनही रस्त्यातील खड्डे जैसे थे च राहिल्याने या मलमपट्टी विरोधात प्रवाशांनी सिडको विरोधात संताप व्यक्त केला होता. उरणच्या या कोस्टल मार्गाच्या दुरावस्थेचे वृत्त लोकसत्ता ने प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सिडकोने तातडीने भर पावसात या मार्गावरील खड्डे भरण्याचे काम केले. मात्र आठ दिवसानंतर पुन्हा एकदा या महामार्गावरील खड्डे जैसे थे स्थितीत असल्याने प्रवासी व वाहनचलकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे खड्डे भरले की मलमपट्टी केली असाही सवाल केला जात आहे. या मार्गावरील खड्डे बुजविसाठी वापरण्यात आलेली खडी उखडून पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. तर अनेक ठिकाणी या रस्त्यावर खडीचे उंचवटे निर्माण झाल्याने वाहनांना खड्डे आणि उंचवटे यांचा सामना करीत धोकादायक स्थितीत वाहन हकावे लागत आहे.
उरण मधील सिडकोच्या सागरी(कोस्टल)मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात; अडीच किलोमीटरच्या रस्त्यासाठी तीन कोटींचा निधी
सिडकोच्या सागरी(कोस्टल)मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून ऑक्टोबर अखेर पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-10-2023 at 14:29 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commencement of repair of cidco coastal route in uran amy