नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेस देशात तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहेच. मात्र यापुढील काळात ते मानांकन उंचाविण्यासाठी आपली जबाबदारीही वाढली असल्याचे मत व्यक्त करीत महापालिका राजेश नार्वेकर यांनी या आधीच्या काळात तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या काळात चांगले काम झाले. त्यामुळे आपला बेंचमार्क सेट झाला असून आता त्यापुढे जाऊन प्रगती करण्यासाठी प्रत्येकजण संपूर्ण क्षमतेने काम करेल असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी अनेक विभागांची माहिती घेण्यास सुरवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नार्वेकरांची इनिंग सुरू

महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी महापालिका अधिकारी यांची विशेष बैठक घेत पहिल्याच बैठकीत विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे यांच्या शुभहस्ते अधिकारी वर्गाच्या वतीने आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेस नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या स्वच्छ अमृत महोत्सवात मिळालेल्या देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे सन्मानचिन्ह, कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग मानांकनाचे सन्मानचिन्ह तसेच इंडियन स्वच्छता लीगमध्ये युवक सहभागाचे देशातील प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र महत्वाचे असून अधिक जोमाने काम करण्याची अपेक्षा नार्वेकर यांनी व्यक्त केलीयापुढील काळात आयुक्त नार्वेकर प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे सविस्तर आढावा घेणार असून विविध विभागांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजाची पाहणी करणार आहे

हेही वाचा : दसऱ्याच्या मुहूर्तावर किरकोळ बाजारात झेंडूचा दर १२० ते १५० रूपये किलो

आयुक्त बांगर यांनी करोना काळातही केलेले चांगले काम तसेच विविध विकास कामे यामुळे यापुढील काळात बांगर यांनी सुरू केलेल्या विविध प्रकल्पांना पूर्ण करण्याची जबाबदारी नार्वेकर यांना पार पाडावी लागणार आहे तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुका व शहरातील पक्षीय राजकारण यांची सांगड घालत पालिकेच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याची जबाबदारी आयुक्तांना पार पाडून शहरातील आरोग्य विषयक सुविधांची गती कायम ठेवावी लागणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner rajesh narvekar reviewe various works officers muncipal carporation of navi mumbai tmb 01