नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर घणसोली रेल्वेस्थानकासमोरील पुलावर ठाण्याकडून बेलापूरच्या दिशेने असलेली मार्गिका काँक्रीटीकरणासाठी पूर्ण बंद झाली आहे. परिणामी घणसोली स्थानकाजवळील बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दिवसरात्र वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर घणसोली पुलाखालील मार्गही वाहतूक विभागाने बंद केल्याने दररोज घणसोली स्थानकात उतरून महापे एमआयडीसी, एल अॅण्ट टी इन्फोटेक तसेच शीळफाट्याकडे कामानिमित्त जाणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी तर रात्री जडअवजड वाहनांचे मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची कमतरता असल्याचे दिसून येत असल्याने वाहतूक कोंडी सुटतासुटत नसल्याचे दृश्य आहे. वाहतूक विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका या ठिकाणी बसत आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

हेही वाचा… बेलापूर, वाशी येथे बहुमजली वाहनतळ, रेल्वेस्थानकाजवळील पार्किंग नियोजनासाठी आयुक्त आग्रही

ठाणे-बेलापूर मार्गावर एकाच वेळी दोन ठिकाणी होणारी कामे, त्यात शिळफाटा भागात होणाऱ्या विकासकामांमुळे वळवलेल्या वाहतुकीची भर पडली आहे. या तिन्ही कामांमुळे ठाणे-बेलापूर मार्गावर सर्वाधिक कोपरखैरणे, घणसोली आणि पुढे ऐरोली-मुलुंड वळण रस्त्यापर्यंत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. घणसोली उड्डाणपुलाचे सिमेंट काँक्रीटीकरण काम सुरू आहे. तसेच तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आल्याने इंदिरा नगर ते कोपरखैरणे हा ठाणे-बेलापूर मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी इंदिरा नगर ते खैरणे एमआयडीसी हा औद्याोगिक वसाहतीतील रस्त्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी खैरणेमधून निघणारी वाहने ठाणे -बेलापूर रस्त्याला मिळतात त्या ठिकाणी नेक पॉईंट तयार झाला आहे.

याशिवाय महापे एमआयडीसीकडून मुलुंड-ठाणे-अंधेरीच्या दिशेने जाणारी अवजड वाहने महापेपासून ठाणे-बेलापूर मार्गावर येतात. त्यात आता घणसोली उड्डाणपुलावर काँक्रीटीकरणाचे कामही सुरू करण्यात आल्याने उड्डाणपुलावरील एक मार्गिका बंद करण्यात आली. वास्तविक एक मार्गिका म्हटले तरी दीड मार्गिका बंद असल्याने दोन अवजड वाहने एकाच वेळेस एका दिशेने जाऊ शकत नाहीत, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यात एखादा छोटामोठा अपघात झाला तर वाहतूक कोंडीतून सुटण्यास किमान अर्धा तास उशीर होतो.

हेही वाचा… नैना क्षेत्रात मेट्रोची धाव, सिडकोकडून सूचिबद्ध आराखड्यासाठी हालचाली सुरू

घणसोली रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलाखालील रस्ता दीड महिना बंद राहणार आहे. येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस आणि खासगी व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे, अशी माहिती अभियांत्रिकी विभागातर्फे देण्यात आली.

उड्डाणपुलावरील काम अनेक दिवस चालणार होते. मात्र एक मार्गिका पूर्ण काम करण्यास दिल्याने हे काम १७ दिवसांत संपणार आहे.वाहतूक पोलीस बळ योग्य तेवढे देण्यात आले आहे. तरीही पाहणी करून त्यात वाढ करण्यात येईल. – तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक पोलीस विभाग

एमआयडीसीत जाणारे नोकरदार त्रस्त

घणसोली उड्डाणपुलाचे काँक्रिटीकरण करताना सुरक्षा म्हणून उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका घणसोली रेल्वे स्थानकात उतरून एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या नोकरदारांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. भुयारी मार्ग बंद केल्याने महापे एमआयडीसीत जाणाऱ्या प्रवाशांना दीड किलोमीटरचा फेरा पडतो आहे.