उरण : सोमवारी गांधी जयंती निमित्ताने उरण मधील गांधी चौकात राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान वाचवा यासाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि पुरोगामी व धर्मनिरपेक्ष संघटनांनी  या उपोषण केले. यावेळी भारताची एकता व एकात्मता आणि  भारताचा गौरव कर्तव्य आणि अधिकार यांची जाणीव करून देण्यासाठी प्रतिज्ञा म्हणण्यात आली.

हेही वाचा >>> २९ तास रखडपट्टी; कोकण रेल्वेवर प्रवाशांचे अतोनात हाल, मालगाडी घसरल्याने अनेक गाडय़ांचा खोळंबा

त्याचप्रमाणे भारताचे संविधान आणि त्याची उद्देशिकेचे ही जाहीर वाचन करण्यात आले. यातून नागरिकांनी एकमेकांशी सलोख्याने वागण्याचे आवाहन करण्यात आले. या उपोषणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,जनवादी महिला संघटना,डी  आय एफ आय,सीआयटीयु तसेच  उरण मधील इतर संघटनानी पाठिंबा दिला. यावेळी माकप चे रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे, सिटु चे भूषण पाटील, जनवादी महिला संघटनेच्या हेमलता पाटील, कुंदा पाटील, किसान सभेचे संजय ठाकूर,डी वाय एफ आय चे राकेश म्हात्रे आदीजण उपस्थित होते.

Story img Loader