पनवेल : लोकसभा निवडणूकीमुळे राज्यात सर्वत्र आचारसंहिता लागू आहे. विना परवानगी कोणत्याही राजकीय पक्षांनी जाहिराती करु नये असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाचे असताना सुद्धा कामोठे येथे राजकीय संदेश देणाऱ्या भिंती रंगविण्यात आल्या होत्या. नागरिकांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अ‍ॅपवर केलेल्या तक्रारीनंतर ही बाब रविवारी उजेडात आली. काही मिनिटांत मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत अनोळखी राजकीय कार्यकर्त्यांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याबाबत तसेच महाराष्ट्र महापालिका मालमत्ता विदृपीकरण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामोठे येथील सेक्टर ३४ मधील कुपणाच्या भिंतीवर फिरसे एकबार मोदी सरकार असा संदेश लिहून त्याशेजारी कमळाचे चिन्ह काढले होते. कामोठेच्या दक्ष नागरिकांनी याबाबत सिव्हीजील (CIVGIL) अ‍ॅपवर निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यावर मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंघला (पी.एम.आर.डी.ए.चे अतिरीक्त आयुक्त) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके (उपविभागीय अधिकारी पनवेल) यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आयोगाने नेमलेले पथक काही मिनिटांत घटनास्थळी पोहचले. भिंतीवरील राजकीय संदेश पुसून टाकण्यात आला आणि कामोठे पोलीस ठाण्यात संदेश लिहिणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा…‘मॅन इन मिडल अटॅक’ म्हणजे काय? व्यापाऱ्याची १ कोटी ५४ लाखांची फसवणूक 

आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये या करिता मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रात ६ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. नागरिकांना सिव्हीजील (CIVGIL) अ‍ॅपव्दारे आचारसंहिता भंग झाल्यास तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तक्रारीनंतर १० मिनिटांत निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी भेट देणार तसेच पुढील ९० मिनिटांत या तक्रारींवर कारवाई करुन त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला देणार आहे. रविवारच्या प्रकरणात कामोठे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विरूपनास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ व महानगर पालिका अधिनियम १९४९ चे कलम २४४ व २४५ अन्वये दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा…उदयनराजे यांना तीन दिवस भेट मिळत नाही याचं वाईट वाटतं – माथाडी नेते नरेंद्र पाटील

यापुढेही ३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील १८८ पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून, आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई तसेच संबंधीत अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. -राहुल मुंडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मावळ मतदारसंघ