मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून तसेच त्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र बाजारात समितीत काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या फसवणूक केली जात आहे. कांदा बटाटा बाजारात सर्वाधिक मालधनी तक्रार असून ९७ शेतकऱ्यांची ३ कोटीहून अधिक रक्कम थकबाकी वसुली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ नुसार शेतमालाची विक्री झाल्या नंतर २४ तासात संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे बंधनकारक असते. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची रक्कम न दिल्यास किंवा शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्यास त्याच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार एपीएमसी प्रशासनाला आहेत. परंतु आद्यप ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची थकीत रक्कम देण्यात आलेली नाही. सन २०११ पासून शेतकऱ्यांच्या मालधनी तक्रार असून सध्या ९७ शेतकऱ्यांच्या तक्रारी असून १४ व्यापाऱ्यांकडून ३ कोटी २५ लाख, ३५ हजार ६४ रुपये थकबाकी वसूल करणे बाकी आहे. मार्च एप्रिल मध्ये ३९ लाख २१हजार, ४०३ रुपये थकबाकी वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती कांदा बटाटा बाजाराचे उपसचिव विठ्ठल राठोड यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaints of 97 farmers in the onion potato market navi mumbai amy
Show comments