नवी मुंबई : नेरुळ, सारसोळे विभागांत गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याच्या तक्रारी येत आहेत. पालिका प्रशासनाने मात्र सारसोळे विभागात पाणीपुरवठा योग्य पद्धतीने होत असल्याचा दावा केला आहे.
सारसोळे गावात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी १६ डिसेंबरपासून येत आहे. याबाबत सारसोळे येथील ग्रामस्थ महिलांनी याबाबत तक्रार करत नळाला गढूळ पाणी येत असून पाण्याला घाण वासही येत असल्याचे सांगितले. नळाला येणारे गढूळ पाणी प्यायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : टोईंग व्हॅन धूळखात पडून, सीवूड्स मॉल परिसरात बेकायदा पार्किंगचा प्रश्न गंभीर
सारसोळे येथील पाण्याबाबतची एकाच घराची तक्रार प्राप्त झाली होती. त्या ठिकाणी तत्काळ तक्रार सोडवून पाईप बदलण्यात आला आहे. अधिक माहिती घेण्यात येईल, असे महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.
नेरुळ सेक्टर ६ येथील प्लॉट क्रमाक २६८ येथे राहत आहे. सारसोळे गावाजवळच आमच्या सोसायट्या असून मागील आठ दिवसांपासून पाण्याला खूप घाण वास येत असून गढूळ पाणी येत आहे. पोटात दुखणे व पोट गच्च होऊन फुगल्यासारखे वाटणे असे प्रकार होत आहेत. आमचे आरोग्य बिघडले तर महापालिका याला जबाबदार असेल. – शिल्पा पिलाने, सारसोळे