सिडकोचे नियोजन; १०० हेक्टर जमीन राखीव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई</strong> :  सिडकोने खारघरमध्ये ट्रल ऑफ एक्सलन्सअंतर्गत दोन फुटबॉल मैदानांचे नुकतेच लोकार्पण केल्यानंतर नवी मुंबईला स्पोर्ट्स सिटी म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी नैना क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कुंडेवहाळ या गावाजवळ १०० हेक्टर जमीन ही केवळ खेळासाठी राखीव ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. 

सेंट्रल ऑफ एक्सलन्सअंतर्गत सिडकोने खारघरमध्ये चार फुटबॉल मैदाने, गोल्फ कोर्स, शूटिंग रेंज, रग्बी मैदान अशा खेळांना प्राधान्य देण्यासाठी सुमारे एक हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात एक ४० हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियमचादेखील समावेश आहे. शहर वसविण्याच्या प्रयत्नात सिडकोने नेहमीच खेळाला दुय्यम स्थान दिले आहे. त्यामुळे सिडकोने आतापर्यंत स्टेडियम अथवा विशेष मैदानांची उभारणी केली नाही. काही बडय़ा संस्थांना इनडोअर गेमसाठी स्पोर्ट्स क्लब स्थापन करण्यास भूखंड दिले, तर डी. वाय. पाटील अ‍ॅकॅडमीला नेरुळमध्ये साठ हजार प्रेक्षक संख्येचे स्टेडियम उभारण्यासाठी मोक्याचा भूखंड दिला.

राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नुकतीच खारघर येथे ८५ कोटी रुपये खर्च करून दोन फुटबॉल मैदाने तयार करून घेण्यात आली आहेत. अशी आणखी दोन फुटबॉल मैदाने बांधली जाणार आहेत. एशियन फुटबॉल महिला स्पर्धकांना सराव करण्यासाठी ही मैदाने तातडीने तयार करण्यात आली असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या १७ वर्षांच्या खालील महिला फुटबॉल स्पर्धासाठी आणखी दोन अशी एकूण चार मैदाने उभी राहणार आहेत. याशिवाय गोल्फ कोर्सला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी त्याची होल संख्या वाढवली जात आहे. वन विभागाच्या आडकाठीमुळे  सिडकोच्या गोल्फ कोर्सची होल संख्या ११ पर्यंत मर्यादित ठेवावी लागली होती. याशिवाय शूटिंग रेंज व स्पोर्ट्स क्लब हाऊसदेखील खारघरमध्ये उभारला जाणार आहे.  याशिवाय सिडकोने नैनाच्या दहा विकास योजना तयार केल्या असून त्यातील प्रत्येक ठिकाण हे

एका संकल्पनेला वाहिलेले असणार आहे. यात पनवेल तालुक्यातील करंजाडे वडघर येथे ६५ हेक्टर जमीन ही केवळ वैद्यकीय संबंधित उद्योग व व्यवसायासाठी राहणार आहे, तर कुंडेवहाळमध्ये १०० हेक्टर जमिनीवर स्पोर्ट्स सिटी उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. याच भागात शैक्षणिक व प्रशिक्षण व्यवसायासाठी १०० हेक्टर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे.

नैना क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, वैद्यकीय , खेळ या विषयांना वाहिलेल्या थीम सिटी तयार करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. खेळासाठी इतक्या मोठय़ा प्रमाणात जमीन उपलब्ध करून देण्याची ही राज्यातील पहिलीची शासकीय संस्था आहे.

खारघरमधील मैदानांसाठी १,७०० कोटी

खारघरला स्पोर्ट्स सिटीचा दर्जा मिळवून देण्यासाठी सिडकोने दहा हेक्टर जमिनीवर ही खेळांची मैदाने व त्यासाठी लागणाऱ्या सेवासुविधा निर्माण केल्या आहेत. स्टेडियम, फुटबॉल, रग्बी, शूटिंग, गोल्फ कोर्स यांसारख्या एकूण खेळांवर एक हजार ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी फुटबॉल मैदान लोकार्पण सोहळय़ात स्पष्ट केले आहे.