नवी मुंबई महापालिका अभियांत्रिकी विभागार्फत शहरात विविध प्रकारची विकासात्मक कामे केली जातात .नवी मुंबई शहरातील विविध व महत्वाच्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत असून एमआयडीसीतील रस्तेही कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहेत.त्याच प्रमाणे शहराअंतर्गत वाहतुकीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या चौकांचे कॉंक्रीटीकरण पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून एकूण ३५ चौकांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत असून आतापर्यंत त्यातील २६ चौकांचे कॉंक्रीटीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली असून शहरात ७ चौकांची कामे करण्यात येत आहेत.चौकांमध्येच पडणाऱ्या खड्ड्यांमुळे व तेथील वाहतूककोंडीमुळे होणारी वाहनचालकांची फरफट निकालात निघणार आहे. परंतू सध्या या चौकामध्येच सुरु असलेल्या कामांमुळे चौकांमध्ये वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबईत शहर रंगरंगोटीसाठी करोडोंचा खर्च; नामफलकांकडे मात्र दुर्लक्ष
शहरात बेलापूर ते दिघा विभागात असलेल्या या संपूर्ण नवी क्षेत्रात असलेल्या विविध विभागांमध्ये मुख्य तसेच शहराअंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. शहराअंतर्गत वाहतूकीच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या चौकांमध्येच पडणारे खड्डे यांच्या अडथळ्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र कायम पाहयला मिळत होते. परंतू चौकांच्या करण्यात येत असलेल्या कामांमुळे वाहतूक परिचलन वेगाने करण्याच्यादृष्टीने पालिकेकडून वेगवान कामे करण्यात येत आहेत. नवी मुंबई शहरात वाढती लोकसंख्या तसेच मोठ्या प्रमाणात वाढणारी वाहनांची संख्या यामुळे सततच्या वाहतूककोंडीला नागरीकांना सामोरे जावे लागत असते.परंतू मागील काही वर्षापासून पालिकेने सुरु केलेल्या चौकांच्या कॉक्रीटीकरणामुळे व त्याचा आकार कमी करण्यामुळे सततची वाहतूककोंडीचा अडथळा दूर होत असल्याने पालिकेने उर्वरीत कामांनाही वेगाने सुरवात केली आहे. परंतू काही ठिकाणी चौकांमध्ये सुरु असलेल्या कामामुळे काम सुरु असलेल्या चौकांच्या ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सीवूड्स पूर्व पश्चिम जोडणाऱ्या एल अॅन्ड टी उड्डाणपुलाजवळच पूर्वेला असलेल्या स्टरलिंग कॉलेजसमोरील चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे मागील दोन तीन दिवसात सायंकाळी नेहमी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. याच चौकाबरोबरच याच मार्गाला लागून असलेल्या चौकातही वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे पूर्व दिशेने उड्डाणपुलावरुन येणारी तसेच उड्डाणपुलावरून पश्चिम दिशेला जाणाऱ्या वाहनांची या वाहतूक चौकात वाहतूक कोंडी होत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसीत भाज्यांच्या दरात वाढ
शहरात काही ठिकाणी चौकांचे कॉक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. सीवूडस पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स्टरलिंग कॉलेजजवळील चौकात सुरु असलेले काम वेगाने सुरु आहे. वेगाने काम करण्यात येत आहे. वाहतूककोंडीच्याबाबत खबरदारी घेऊन काम करण्यात येत आहे.
अरविंद शिंदे ,कार्यकारी अभियंता