नवी मुंबई : Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने कौल दिला आणि देशात काँग्रेस मध्ये आनंदाची भरती आली. नवी मुंबई काँग्रेसने हा विजय साजरा केला.  कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत, प्रदेश प्रवक्ता नासिर हुसेन यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात ढोल ताशे वाजवत गुलाल उधळून जल्लोश साजरा केला. राहुल गांधी, सोनिया गांधी यांचा जयघोष करीत घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी ” हा विजय केवळ काँग्रेसचा नसून तमाम कर्नाटकी जनतेचा, लोकशाहीचा आहे.” अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा